शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सुनेवर अत्याचार

By admin | Updated: September 3, 2015 02:44 IST

हुंड्यासाठी छळल्या जात असलेल्या एका नवविवाहितेवर तिच्याच सासऱ्याने गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात घडली.

हुंड्यासाठी केला छळ : आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल नागपूर : हुंड्यासाठी छळल्या जात असलेल्या एका नवविवाहितेवर तिच्याच सासऱ्याने गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात घडली. अमरावती येथील २८ वर्षीय तरुणीचे जानेवारी २०१३ मध्ये एमआयडीसीतील एका तरुणाशी लग्न झाले होते. विवाहितेचा पती शिक्षक आहे. लग्नाच्या काही दिवसानंतरच पती, सासरा आणि इतर कुटुंबीय हुंड्यासाठी तिचा छळ करू लागले. माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकू लागले. पीडितेचे आई-वडील गरीब असल्याने तिने या गोष्टीला फार गांभीर्याने घेतले नाही. आपले म्हणणे गांभीर्याने घेत नसल्याचे पाहून ते तिला आणखी त्रास देऊ लागले. तिला चाकू फेकून जीवे मारण्याची धमकी दिली. गेल्या दोन वर्षांपासून पीडिता त्रास सहन करीत होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार ३१ मार्च रोजी तिला सर्दीचा त्रास झाला. ती पलंगावर लेटली असताना तिच्या सासऱ्याने तिच्या तोडावर रुमाल ठेवला. ती बेशुद्ध झाली. त्यानंतर सासऱ्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान तिला अमानवीय त्रास दिला. शुद्धीवर येताच पीडित महिला अमरावतीला आपल्या आई-वडिलांकडे निघून गेली. पीडितेने एमआयडीसी पोलिसांना पत्र लिहून आपबिती सांगितली. पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधून येथे येण्यास सांगितले. नागपुरात पोहोचून विवाहितेने तक्रार दाखल केली. एमआयडीसी पोलिसांनी बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, मारहाण आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.(प्रतिनिधी)लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपी मो. जुनैद मुस्ताक दिलावर (२५) रा. खदान याला मानकापूर पोलिसांनी अटक केली. जुनैद तीन वर्षांपासून १८ वर्षीय विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिला फिरवीत होता. यादरम्यान त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. विरोध केला असता वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत होता.