नागपूर : प्रेयसीला लग्नाचे आमीष दाखवून पाच वर्षांपर्यंत शारीरिक सबंंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीच्या विरुद्ध नंदनवन पोलिसांनी बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नंदनवन परिसरात उघडकीस आली आहे.अविनाश शरदचंद्र खडके (३६) रा. नाक्षी रोड भिवापूर असे आरोपीचे नाव आहे. ३० वर्षीय पीडित युवती व आरोपी हे २०११ मध्ये एका हॉटेलात काम करीत होते. तेव्हा त्यांची ओळख झाली. दोघेही मोबाईलवर सातत्याने बोलत असत. यानंतर दोघेही लग्न न करता एका भाड्याच्या घरात सोबत राहू लागले. अगोदर नंदनवन परिसरातील व्यकंटेशनगर येथे ते राहत होते. नंतर खासगी कामासाठी आरोपी युवतीला घेऊन गडचिरोलीला गेला. यानंतर पुन्हा युवतीला घेऊन तो नंदनवन परिसरात राहू लागला. यादरम्यान त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध झाले. दरम्यान पीडित युवती लग्नासाठी दबाव टाकू लागली. तेव्हा तो टाळाटाळ करू लागला. तीन दिवसांपूर्वी आरोपी अचानक तिला एकटीला भाड्याच्या घरात सोडून पळून गेला. पीडित युवतीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
By admin | Updated: June 18, 2016 02:30 IST