शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील चित्रफित तयार करून परिचारिकेवर अत्याचार

By admin | Updated: June 22, 2017 02:23 IST

शीतपेयातून गुंगीचे औषध दिल्यानंतर अश्लील चित्रफित तयार करून एका आरोपी डॉक्टरने परिचारिकेचे शोषण केल्याची घटना पुढे आली आहे.

आरोपी डॉक्टरला अटक : अडीच महिन्यांपासून करीत होता शोषण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शीतपेयातून गुंगीचे औषध दिल्यानंतर अश्लील चित्रफित तयार करून एका आरोपी डॉक्टरने परिचारिकेचे शोषण केल्याची घटना पुढे आली आहे. अडीच महिन्यापासून शोषणाची बळी ठरलेल्या परिचारिकेने दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. शेखर सूर्यभान तायडे (३२) रा. हिंगणा असे या आरोपी डॉक्टरचे नाव आहे. शेखरने बीएएमएस केले आहे. तो बजाजनगरच्या सिम्स हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) आहे. पीडित युवती परिचारिका आहे. ती रुग्णालयाच्या वसतिगृहात राहते. युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार शेखरने स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगून या युवतीशी मैत्री केली. शेखरने तिला लग्नाचे वचन दिल्यामुळे ती त्याच्या जाळ्यात अडकली. एप्रिल महिन्यात शेखर युवतीला बजाजनगरच्या एका धार्मिक स्थळी घेऊन गेला. तेथे त्याने तिला शीतपेय पाजले. शीतपेय पिताच युवतीला गुंगी येऊ लागली. शेखरने तिला वसतिगृहात सोडण्याच्या बहाण्याने आपल्या घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार करतानाची चित्रफित तयार केली. त्यानंतर ही चित्रफित दाखवून तो वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करीत होता. मनाई केल्यास चित्रफित व्हायरल करण्याची धमकी तो तिला देत होता. यामुळे ही परिचारिका घाबरली. ती येथे एकटीच राहते. अविवाहित असल्यामुळे बदनामीच्या भीतीने ती शेखरचा अत्याचार सहन करीत होती. शेखरच्या अत्याचारामुळे त्रस्त झाल्यामुळे युवती त्याच्यापासून चार हात दूर राहू लागली. यामुळे शेखर संतापला. तो तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकू लागला. नुकतेच या युवतीचे लग्न ठरले आहे. शेखरने या युवतीच्या भावी पतीला अश्लील चित्रफित पाठविल्यामुळे तिचे लग्न मोडले. त्यानंतर या युवतीने बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी शेखरला अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून अश्लील चित्रफितही ताब्यात घेतली आहे. यापूर्वीही त्याने अशा युवतींवर अत्याचार केल्याची शंका आहे. पोलिसांनी २५ जूनपर्यंत त्याची कोठडी मिळविली आहे.