शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बिर्याणी देण्याच्या बहाण्याने अत्याचार

By admin | Updated: July 28, 2016 02:35 IST

बिर्याणी खाऊ घालण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर मानलेल्या भावानेच अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गिट्टीखदान परिसरातील घटना : मानलेल्या भावानेच केले कृत्य नागपूर : बिर्याणी खाऊ घालण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर मानलेल्या भावानेच अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गिट्टीखदान परिसरात घडली. अस्सुभय्या ऊर्फ यशवंत हीरालाल गौर (३०) रा. सुरेंद्रगड असे आरोपीचे नाव आहे. तो मासे विक्रेता आहे. पीडित १७ वर्षीय विद्यार्थिनी त्याच्या वस्तीत राहते. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार ती यशवंतला भाऊ मानते. वडिलांचा मृत्यू झाला आहे. आई मजुरी करते. २४ जुलै रोजी रात्री यशवंतने बिर्याणी खाण्यासाठी विद्यार्थिनीला मोमीनपुरा येथे चलण्यास म्हटले. यशवंतसोबत जात असल्याचे सांगून ती घरून निघाली. यशवंत तिला गिट्टीखदन चौकात घेऊन गेला. तेथून मोमीनपुरा येथे जाऊन बिर्याणी खरेदी केली. बिर्याणी घेतल्यानंतर तो तिला घेऊन गोरेवाडा उद्यान तलावाजवळ घेऊन गेला. तिथे बिर्याणी खाताना सोबत कोल्डड्रिंक सुद्धा घेतले. कोल्डड्रिंकमध्ये त्याने दारू टाकली. विद्यार्थिनीला शंका आली. तिने ती पिण्यास नकार दिला. त्याने बळजबरीने पाजली. तिला नशा येऊ लागली. याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. रात्री १ वाजता त्याने पीडित मुलीला बाईकने घरी सोडून दिले. मुलीची अवस्था पाहून आईला शंका आली. विचारपूस केली तेव्हा पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितला. गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्कार व अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.(प्रतिनिधी)