गृहिणींचे बजेट आटोक्यात : आवक वाढलीनागपूर : यंदा उन्हाळ्यात स्थानिक उत्पादकांची आवक वाढल्याने बहुतांश भाज्या स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडणार्या आहेत. टमाटर, वांगे, पत्ता कोबी, कोहळे, तोंडले या भाज्यांमुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट आटोक्यात आहेत. सध्या कांदे आणि बटाट्याची आवक कमी झाली असून दर वाढण्याची शक्यता आहे. बाजारात आवक वाढलीसध्या कॉटन मार्केट बाजारात लहानमोठय़ा २00 गाड्यांची आवक आहे. काही भाज्या नागपूरपासून २५0 ते ३00 कि.मी. अंतरावरून तर काही लगतच्या राज्यातून येत आहेत. त्याच कारणाने भेंडी, कारले, सिमली मिरची महाग आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत दर स्थिर राहतील, अशी माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली. स्थानिक उत्पादकांकडून सर्वाधिक आवक आहे. कॉटन मार्केटमध्ये नाशिकहून टमाटर मोठय़ा प्रमाणात येत असल्याने प्रति किलो भाव ६ रुपये आहे. मटर जबलपूर, गाजर दिल्ली आणि सिमला मिरची दिग्रस, नाशिक टमाटर, रायपूर येथून तोंडले, ओरिसातून फणस आणि जगदलपूर येथून हिरवी मिरचीची आवक आहे. नाशिक येथून येणारे टमाटर वाहतुकीला परवडत नाही, पण आवक जास्त असल्याने दरही कमी आहेत. किरकोळमध्ये बटाटे महागआवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात बटाटे महाग आहेत. २५ रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कळमन्यात छिंदवाडा, आग्रा, कानपूर, अहमदाबाद येथून आवक आहे. दररोज १२ ते १३ ट्रकची आवक आहे. रविवारी चांगल्या प्रतीच्या बटाट्याचे भाव १६ ते १८ रुपये किलो होते. किरकोळमध्ये २५ रुपये दर आहेत. (प्रतिनिधी)कळमन्यात कांदे १८ रुपयांवर!कळमना बाजारात कांदे प्रति किलो १६ ते १८ रुपयात विक्री सुरू आहे. पुढील काही दिवसात कांदे महागतील, अशी शक्यता व्यापार्यांनी व्यक्त केली आहे. दररोज २0 ट्रक असलेली आवक सध्या १२ ते १५ पर्यंंत कमी झाली. शेतकरी आणि व्यापार्यांनी उन्हाळी कांद्याची साठवणूक केली आहे. शेतकरी त्याला हव्या असलेल्या भावात विक्री करीत आहेत. त्यामुळे आवक घटली आहे. परिणामी भाववाढ झाल्याचे कळमन्यातील आलू-कांदा असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी सांगितले. बुलडाणा येथून लाल कांदा तर अमरावती व अकोला येथून पांढरा कांदा येत आहे. अहमदनगर येथून एक किंवा दोन ट्रक आवक आहे. रविवारी लाल कांदा ५00 ते ६00 रुपये (४0 किलो) आणि पांढरा कांदा ६५0 ते ७५0 रुपये भाव होते.
टमाटर, वांगे, पत्ताकोबी स्वस्त
By admin | Updated: June 10, 2014 01:12 IST