शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे ‘जीएसटी’वर आज चर्चासत्र

By admin | Updated: February 24, 2017 03:01 IST

लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे शुक्रवार, २४ फेब्रुवारीला दुपारी २.३० वाजता प्राईड हॉटेलमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रत्यक्ष कर व इंडो-यूएस कर नियमनावर सत्र : प्रश्नांवर तज्ज्ञांचे उत्तरनागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे शुक्रवार, २४ फेब्रुवारीला दुपारी २.३० वाजता प्राईड हॉटेलमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी लोकमत मीडियाचे चेअरमन आणि माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा राहतील. मुख्य अतिथी म्हणून बँक आॅफ इंडियाचे झोनल व्यवस्थापक सी.जी. पोपेरे आणि विक्रीकर विभागाचे सहआयुक्त (व्हॅट, प्रशासन) पी.के. अग्रवाल हजर राहणार आहे. उद्घाटन सत्रानंतर तांत्रिक सत्र होणार आहे. या सत्रात वरिष्ठ सनदी लेखापाल आणि एन ए शाह असोसिएट्स, मुंबईचे भागीदार अशोक शाह व नरेश सेठ आणि एन एस ग्लोबलचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सनदी लेखापाल संकेत शाह हे मार्गदर्शन करणार आहेत. तज्ज्ञ वक्ते प्रत्येक सत्रात ४५ मिनिटे मार्गदर्शन करणार असून त्यानंतर १५ मिनिटे प्रश्नोत्तराचे सत्र राहील. पहिल्या सत्रात ‘अर्थसंकल्प-२०१७ मध्ये प्रत्यक्ष करात महत्त्वाची दुरुस्ती’ यावर वरिष्ठ सनदी लेखापाल अशोक शाह आणि दुसऱ्या सत्रात सनदी लेखापाल नरेश सेठ हे ‘जीएसटी’मध्ये संधी आणि आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करतील. तिसऱ्या सत्रात सनदी लेखापाल आणि सीपीए (यूएसए) संकेत शाह हे ‘यूएसए-इंडिया कर नियमन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली हे जीएसटी परिषदेचे प्रमुख असून त्यांनी नुकतेच उदयपूर (राजस्थान) येथे जीएसटी कायदा मसुद्याला अंतिम स्वरूप दिले. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राच्या दुसऱ्या भागात या मसुद्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या चर्चासत्राचा व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, लघु व मध्यम उद्योजक व मोठ्या उद्योजकांना चर्चासत्राचा फायदा होणार आहे.(प्रतिनिधी)