शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

बुटीबोरीत आज आरोग्य तपासणी शिबिर

By admin | Updated: October 8, 2014 01:03 IST

समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ८ आॅक्टोबर रोजी भव्य नि:शुल्क

जैन सहेली मंडळाचा उपक्रम : महिला व बालकांसाठी नि:शुल्क नागपूर : समाजातील गरीब, वंचित घटकांच्या कल्याणाची बांधिलकी जोपासण्याचा एक भाग म्हणून जैन सहेली मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ८ आॅक्टोबर रोजी भव्य नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड वेल्फेअर सेंटर, जैन सहेली मंडळ, पी-६०, आर अ‍ॅन्ड सी झोन, इरा इंटरनॅशनल शाळेजवळ, एमआयडीसी इंडस्ट्रीयल परिसर, बुटीबोरी येथे सकाळी १०.३० वाजतापासून शिबिराला सुरुवात होईल. महिला व बालकांसाठी हे शिबिर नि:शुल्क आहे.या आरोग्य शिबिराचे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि महात्मे नेत्रपेढी इस्पितळ यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे. डॉ. संजय दर्डा व डॉ.अनिता दर्डा यांच्या नेतृत्वात उपराजधानीतील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ या शिबिरात सहभागी होणार आहेत. शिबिरात गरजवंत रुग्णांचे डोळे तपासून त्याचवेळी मोफत चष्मेवाटप करण्यात येईल. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार महात्मे नेत्रपेढी इस्पितळ येथे मोतीबिंदूची नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात येईल. याकरिता येणाऱ्या रुग्णांना स्वत:चे ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे. नोंदणी शिबिराच्या ठिकाणीच दुपारी १ वाजेपर्यंत होईल. बुटीबोरी येथील महिलांनी या सुवर्णसंधीचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जैन सहेली मंडळाच्या अध्यक्ष माधुरी बोरा यांनी केले असून अधिक माहितीसाठी रजनी शहलोत (९३७३१००६९०), रीतिका संघवी (९४२०३९७५६८) व अमिषा नगरवाला (९८२२२६५५६५) यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी)मेडिकलचे डॉक्टर देणार सेवाया शिबिरात मेडिकलचे औषधवैद्यकशास्त्र तज्ज्ञ (फिजिशियन), शल्यचिकित्सक (सर्जन), अस्थिरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ (गायनकॉलाजिस्ट), बालरोग तज्ज्ञ (पेडियाट्रीशियन) आपली सेवा देणार आहेत. यातील गरजू रुग्णांना पुढील उपचारासाठी मेडिकलमध्ये बोलविण्यात येईल.गरजवंताना मोफत चष्मेमहात्मे नेत्रपेढी इस्पितळातर्फे शिबिरात गरजवंत रुग्णांचे डोळे तपासून त्याचवेळी मोफत चष्मेवाटप करण्यात येईल. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार मोतीबिंदूची नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात येईल. हिमोग्लोबीन, ईसीजीची तपासणीशिबिरात सहभागी होणऱ्या महिलांचे हिमोग्लोबिन, ईसीजी व रक्तदाबाची नि:शुल्क तपासणी करण्यात येईल.