शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपरमध्ये’ आज पहिले किडनी प्रत्यारोपण

By admin | Updated: February 9, 2016 02:56 IST

बहुप्रतीक्षेत असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मंगळवारी पहिले किडनी प्रत्यारोपण होत आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांत हे पहिले केंद्र ठरणार आहे.

आईकडून मुलीला मिळणार जीवनदान!नागपूर : बहुप्रतीक्षेत असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात मंगळवारी पहिले किडनी प्रत्यारोपण होत आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांत हे पहिले केंद्र ठरणार आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून ही शस्त्रक्रिया होत आहे. विशेष म्हणजे, या प्रत्यारोपणातून एका तरुणीला जीवनदान मिळणार आहे. तिला तिच्याच आईकडून किडनी दिली जाणार आहे.राज्यातील हजारो रु ग्ण डायलिसिसवर जगत आहेत. यातील शेकडोहून अधिक रु ग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. याला घेऊनच नागपूर मेडिकल प्रशासनाने पुढाकार घेत सुपर स्पेशालिटी रुग्णालयांत किडनी प्रत्यारोपण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड वर्षांपासून याची तयारी सुरू होती. जानेवारी महिन्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तयारीला वेग आला होता. मंगळवारी पहिले प्रत्यारोपण होत आहे. एका २४ वर्षीय युवतीवर हे प्रत्यारोपण होणार आहे. ही युवती गेल्या १० वर्षांपासून किडनी आजाराने ग्रस्त होती. तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने ती डायलिसीवर जगत होती. तिला तिच्या आईनेच किडनी दान केली आहे. सर्व कायदेशीर प्रक्रियांमधून तिच्या आईने तिला आपली एक किडनी दिली आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व सुपर स्पेशालिटीचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनात नेफ्रोलॉजीस्ट डॉ. कोलते यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. समीर चौबे, डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. मनीष बलवानी हे या किडनी प्रत्यारोपणासाठी सहकार्य करणार आहेत. उद्या सकाळी होणारी ही शस्त्रक्रिया तीन तासांवर चालणार आहे. एकाच वेळी आईची किडनी काढून मुलीमध्ये प्रत्यारोपण केले जाईल.(प्रतिनिधी)