शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आज अन्नदात्यासाठी अन्नत्याग

By admin | Updated: March 19, 2017 02:56 IST

यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याच्या आत्महत्येला उद्या १९ मार्च रोजी...

भूमिपुत्रांनो मोठ्या संख्येने सहभागी व्हा नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे या शेतकऱ्याच्या आत्महत्येला उद्या १९ मार्च रोजी ३१ वर्षे पूर्ण होत आहे. त्या दुर्दैवी घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ उद्या राज्यभरात एक दिवसाचे अन्नत्याग (उपवास) आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नागपुरातील विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. यात ‘जनमंच’ संस्थेतर्फे नागपुरात महाराज बाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर सकाळी १० ते दुपारी ३ वाजता दरम्यान आंदोलन केले जाणार आहे. याशिवाय यवतमाळ, मूर्तिजापूर आणि काटोल येथे आंदोलन होणार असल्याची माहिती जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड़ अनिल किलोर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. अन्नदात्यासाठी करण्यात येणाऱ्या या आंदोलनात भूमिपुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले आहे. ‘जनमंच’ सोबतच विदर्भ राज्य आघाडीतर्फेसुद्धा शहरातील संविधान चौकात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता दरम्यान अन्नत्याग व धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आजपर्यंत विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, व यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या करू न आपली जीवनयात्रा संपविली आहे. त्यांच्या स्मृतीत हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाचा शेतकरी नेते अमर हबीब यांनी सर्व प्रथम बिगुल फुंकला. त्यानंतर या आंदोलनास राज्यभरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू लागला आहे. उद्या १९ मार्च रोजी राज्यभरात गावोगावी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ केला जाणार आहे. सातेफळ गावांत काळ्या ठिपक्यांची रांगोळी काढून त्या घटनेचा निषेध नोंदविला जाणार आहे. तसेच चील गव्हाण या गावात उद्या एकाही घरी चुल पेटणार नाही.(प्रतिनिधी)