शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आज फिर आँख मे नमी सी है...!

By admin | Updated: September 5, 2014 01:13 IST

युगच्या मृत्यूने समाजमन ढवळून निघाले. प्रत्येकाच्याच मनात निरागस युगच्या मृत्यूची हळहळ आणि मारेकऱ्यांविषयीचा संताप आहे. आज ही हळहळ पुन्हा संयमाने धीरगंभीर वातावरणात व्यक्त झाली.

युगच्या मृत्यूची हळहळ : नागपूरकरांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना नागपूर : युगच्या मृत्यूने समाजमन ढवळून निघाले. प्रत्येकाच्याच मनात निरागस युगच्या मृत्यूची हळहळ आणि मारेकऱ्यांविषयीचा संताप आहे. आज ही हळहळ पुन्हा संयमाने धीरगंभीर वातावरणात व्यक्त झाली. चांडक कुटुंबीयांच्यावतीने युगच्या निधनाबद्दल (उठावना) श्रद्धांजली सभेचे आयोजन लकडगंज परिसरातील टिम्बर भवन येथे करण्यात आले. याप्रसंगी चांडक यांच्या नातेवाईकांसह संवेदनशील नागपूरकर नागरिकही मोठ्या संख्येने युगला श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित झाले. याप्रसंगी डॉ. मुकेश चांडक, युगची आई, रमनलाल चांडक आदी कुटुंबीयांचे उपस्थितांनी सांत्वन केले. युगच्या हसऱ्या, प्रसन्न छायाचित्राकडे पाहून अनेकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करताना दु:ख व्यक्त केले. पण नातेवाईक आणि नागपूरकर नागरिकांनी स्वत:च्या भावनेला आवर घालत चांडक कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला. साधारणत: अशा आयोजनात स्वाभाविकपणे नातेवाईकांचा सहभाग असतो. पण या घटनेने हळहळलेले नागपूरकर युगला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झाले होते. अनेकांनी केले चांडक यांचे सांत्वनजी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. पण आता नाईलाज झाला आहे. युगच्या हत्येने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. पण आज चांडक परिवाराच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी पुन्हा जगण्याला सामोरे जाण्यासाठी त्यांचे सांत्वन केले. अनेकांनी डॉ. मुकेश यांना आलिंगन देऊन त्यांच्या वेदनेत आपण सहभागी असल्याचा धीर त्यांना दिला. युगची आई अद्याप या धक्क्यातून सावरली नाही. त्यांच्या डोळ्यात सतत अश्रू होते. महिलांनी त्यांना धीर देत हे दु:ख सोसण्याचे बळ त्यांना मिळावे, अशी प्रार्थना केली. मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालक चिंतेतप्रत्येकाच्या कुटुंबात लहान मुले असतात. प्रत्येक बाब मुलांना समजावून सांगता येत नाही. ती निरागस असतात. स्वाभाविकपणे ओळखीच्या व्यक्तींवर त्यांचा विश्वास बसतो. पण आता ओळखीच्या व्यक्तींवरही विश्वास ठेवता येत नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याबद्दल पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अशा परिस्थितीत मुलांना सुरक्षित कसे ठेवायचे, हा प्रश्न पालकांना पडला आहे. याबाबत पालकांमध्ये चर्चा होती. ओळखीच्या व्यक्तींवरही विश्वास ठेवायचा नाही, त्यांच्याशी बोलायचे नाही, असे बंधन मुलांवर टाकणे गैर आहे. किती बाबींपासून मुलांचे जगणे हिरावून घ्यायचे, हा प्रश्न यावेळी चर्चेला होता. मुले सुरक्षित राहिली पाहिजे, यासाठी काय करता येऊ शकते, याबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.