शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

चार तालुक्यातील तूर खरेदी केंद्र केले बंद

By admin | Updated: February 18, 2017 00:23 IST

खुल्या बाजारात तुरीचे दर घसरल्याने शेतकरी तूर विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रांकडे वळले

भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी : कमी दरात शेतमाल विकण्याची वेळ यवतमाळ : खुल्या बाजारात तुरीचे दर घसरल्याने शेतकरी तूर विक्रीसाठी शासकीय खरेदी केंद्रांकडे वळले. मात्र जागेअभावी चार तालुक्यांतील तूर खरेदी केंद्रच बंद करण्याचा निर्णय झाला. त्याचा जबर फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी तुरीचे दर निम्यावर आले आहे. धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी आपली तूर नाफेडच्या खरेदी केंद्राकडे नेण्यास सुरूवात केली. नाफेडचे तुरीचे दर प्रती क्विंटल ५०५० रूपये आहे. खासगी बाजारात हेच दर ३८०० ते ४५०० रूपयांपर्यत खाली घसरले आहे. यामुळे शासकीय खरेदी केंद्राकडे तूर नेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. आता या केंद्रातील तूर साठवणुकीची क्षमता संपली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चार खरेदी केंद्र शुक्रवारपासून बंद करण्यात आले आहे. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेले सर्वात महत्वाचे यवतमाळ केंद्रही बंद झाले आहे. सोबतच राळेगाव, बाभूळगाव व आर्णी येथील केंद्र बंद करण्यात आले. या केंद्रांवर तूर विकण्यासाठी दोन हजार शेतकरी वेटींगवर आहे. या केंद्रांवर शेतकऱ्यांची तूर येऊन पडला आहे. मात्र जागाच नसल्याने त्या तुरीची उचल होणार नसल्याचे विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने स्पष्ट केले. शासकीय खरेदी केंद्राच्या आशेवर असलेले शेतकरी आता चांगलेच अडचणीत सापडले आहे. या चार केंद्रांवर आत्तापर्यंत १० हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली. आणखी एक लाख क्विंटपेक्षा जास्त तूर या केंद्रावर येण्याची शक्यता आहे. तूर साठवणुकीसाठी जागा नसल्याने पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी जागा उपलब्ध करून देण्यास होकार दिला. मात्र अद्याप जागा मिळाली नाही. यामुळे तूर खरेदी केंद्र शुक्रवारी अखेर बंद करण्यात आले. संपूर्ण भिस्त मार्केटींग फेडरेशनवर विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे चार खरेदी केंद्र बंद झाले. १० खरेदी केंद्र सुरू आहेत. यात वणी केंद्राची स्थिती बिकट आहे. हे केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. पुसद, दिग्रस, उमरखेड, नेर, दारव्हा, कळंब, पांढरकवडा, घाटंजी व मुकुटबन कें द्र कसे तरी सुरू आहे. या १० केंद्रांवर आत्तापर्यंत २१ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली. तेथे दररोज २१०० क्विंटलची आवक होत आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत जात आहे. (शहर वार्ताहर)