शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:11 IST

नागपूर लोकसभेचे ११ एप्रिलला मतदान आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. आयोगाच्या प्रयत्नानंतरही निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या शिक्षकांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पोस्टल बॅलेटसाठी या शिक्षकांना विधानसभा क्षेत्राची चक्कर मारावी लागत आहे.

ठळक मुद्देपोस्टल बॅलेटचे फॉर्म जमा करण्यासाठी शिक्षकांची भटकंतीप्रशिक्षणादरम्यान फॉर्म घेण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभेचे ११ एप्रिलला मतदान आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. आयोगाच्या प्रयत्नानंतरही निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या शिक्षकांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पोस्टल बॅलेटसाठी या शिक्षकांना विधानसभा क्षेत्राची चक्कर मारावी लागत आहे.लोकसभेच्या मतदानासाठी सरकारी कर्मचारी व शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण बुधवारपासून सुरू झाले आहे. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शिक्षकांच्या तक्रारी आहेत की, पोस्टल बॅलेटसाठी त्यांचे फॉर्म प्रशिक्षण स्थळावर स्वीकारले जात नाही.काटोल विधानसभा क्षेत्रातील शिक्षकांचे नुकतेच निवडणूक प्रशिक्षण झाले. शिक्षकांना पोस्टल बॅलेट फॉर्म भरण्यास सांगितले होते. परंतु केवळ काटोल विधानसभा क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या शिक्षकांचे फॉर्म स्वीकारण्यात आले. हिंगणा, सावनेर आदी विधानसभा क्षेत्रातील शिक्षकांना त्यांच्या विधानसभा क्षेत्रात फॉर्म जमा करण्यास सांगण्यात आले. परंतु जेव्हा शिक्षक आपल्या विधानसभा क्षेत्रात फॉर्म जमा करण्यास गेले, तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी पोस्टल बॅलेट फॉर्म स्वीकारण्यात येईल. बुधवारी दुसरेही प्रशिक्षण पार पडले. शिक्षक फॉर्म जमा करण्यास गेले तेव्हा फॉर्म स्वीकारण्यास नकार देण्यात आला. त्यांना संबंधित विधानसभा क्षेत्रातच फॉर्म जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले.प्रशिक्षण स्थळावरच घ्यावे फॉर्मफॉर्म न स्वीकारल्यामुळे नाराज झालेल्या शिक्षकांचे म्हणणे आहे की, प्रशासनाकडून दरवेळी शिक्षकांना त्रास देण्यात येतो. एक शिक्षक आपला अनुभव सांगताना म्हणाले की, मी २००० मध्ये नोकरीला लागलो. गेल्या १९ वर्षात ४ लोकसभा, विधानसभा, ग्रा.पं., पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत ड्युटी केली. पण आतापर्यंत केवळ एकदाच पोस्टल बॅलेटने मतदान करण्याची संधी मिळाली. शिक्षकांचे म्हणणे आहे की, प्रशिक्षण स्थळावरच सर्व शिक्षकांचे फॉर्म स्वीकारण्यात यावे. ते संबंधित विधानसभा क्षेत्रात पाठवून पोस्टल बॅलेट उपलब्ध करून द्यावे. एकीकडे निवडणूक आयोग प्रत्येक मत किमती असल्याचे सांगून जनजागृती करीत आहे. दुसरीकडे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून शिक्षकांचे मतदान नाकारण्यात येत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019