शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
7
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
10
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
11
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
12
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

खासगी ‘कॅब’मुळे ‘ओलं’ होण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 1:00 AM

दरवर्षी हिवाळी अधिवेशनात नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या जिल्ह्यातून वाहने अधिग्रहित करण्यात येतात. परंतु पावसाळी अधिवेशनात हे शक्य नसल्याने प्रथमच खासगी कॅब सर्व्हिससोबत करार करण्यात आला आहे. मात्र या खासगी ‘कॅब’मुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पहिल्याच दिवशी ताटकळण्याची वेळ आली व अनेक जण पावसामुळे नव्हे तर घामामुळेच ओले झाल्याचे चित्र दिसून आले.

ठळक मुद्देअधिकारी व कर्मचाऱ्यांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दरवर्षी हिवाळी अधिवेशनात नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या जिल्ह्यातून वाहने अधिग्रहित करण्यात येतात. परंतु पावसाळी अधिवेशनात हे शक्य नसल्याने प्रथमच खासगी कॅब सर्व्हिससोबत करार करण्यात आला आहे. मात्र या खासगी ‘कॅब’मुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पहिल्याच दिवशी ताटकळण्याची वेळ आली व अनेक जण पावसामुळे नव्हे तर घामामुळेच ओले झाल्याचे चित्र दिसून आले.हिवाळी अधिवेशनात बाहेरून गाड्या अधिग्रहित केल्या जातात. पावसाळ्यात पूर परिस्थिती तसेच इतर आपत्कालीन कामांसाठी वाहनांची गरज असल्याने खासगी ‘कॅब’ कंपनीची सेवा घेण्यात येत आहे. अधिवेशनासाठी मुंबईतून आलेले मंत्रालयीन अधिकारी-कर्मचारी, मंत्र्यांचे कर्मचारी यांना यंदा ही सेवा पुरविण्यात आली आहे. याचे सर्व भाडे सरकार भरत असून यासाठी विशेष ‘अ‍ॅप’देखील तयार करण्यात आले आहे.मात्र पहिल्याच दिवशी या सेवेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनस्ताप झाला. सुरक्षेच्या कारणांमुळे या ‘कॅब’ विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आणू दिल्या जात नसून त्यांचे ‘पार्किंग’ लांब ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ऐन कामाच्या वेळी अनेक कर्मचाऱ्यांना पायपीट करावी लागली. शिवाय बुधवारी ढगाळ व दमट वातावरण होते. त्यामुळे अनेक जण घामामुळे ओलेचिंब झाले.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Olaओला