शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

विधानभवनात कडेकोट बंदोबस्त, तरी परिसरात मोकाट कुत्र्यांचा ‘मोर्चा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2022 07:00 IST

Nagpur News विधीमंडळाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा फोर्सवन ते क्युआरटीची पथके तैनात करण्यात आली आहेत. ‘परिंदा भी पर नही मार सकता’ अशी सुरक्षाव्यवस्था असताना त्याला भेदून मोकाट कुत्र्यांनी मात्र विधानभवन परिसरात सहज प्रवेश केला आहे.

ठळक मुद्दे लोकप्रतिनिधींना दंश झाल्यावर येणार का जाग ?चालत्याफिरत्या धोक्याकडे प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष

योगेश पांडे नागपूर : विधीमंडळाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा फोर्सवन ते क्युआरटीची पथके तैनात करण्यात आली आहेत. ‘परिंदा भी पर नही मार सकता’ अशी सुरक्षाव्यवस्था असताना त्याला भेदून मोकाट कुत्र्यांनी मात्र विधानभवन परिसरात सहज प्रवेश केला आहे. सायंकाळच्या वेळी तर अक्षरश: शाळा भरल्यासारखे ते एका ठिकाणी जमले होते. त्यांना हाकलून लावण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नसून लोकप्रतिधिनींना दंश झाल्यावरच जाग येणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे. अनेक भागात हे कुत्रे घोळक्यात राहतात व ध्यानीमनी नसताना अचानक हल्ला करतात. शहरात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. विशेषत: रात्रीच्या वेळी तर फारच गोंधळ करतात. रात्री घरी जाणाऱ्यांना अक्षरश: मुठीत जीव घेऊन रस्त्याने जावे लागते. नागपुरातील कुठल्याही कोपऱ्यातील नागरिकाला विचारले की सगळ्यात जास्त कशाची भिती वाटते तर बहुतांश लोकांचे उत्तर मोकाट कुत्रे हेच येईल. न्यायालयानेदेखील मोकाट कुत्र्यांच्या मुद्द्यावर प्रशासनाला अनेकदा फटकारले आहे. मात्र त्यावर थातुरमातूर पावले उचलून परत ‘जैसे थे’ स्थितीच होते. विधानभवन परिसरात अधिकाऱ्यांच्या याच हलगर्जीपणाचे उदाहरण पहायला मिळत आहे. बचतगटांतर्फे चालविले जाणारे उपहारगृह, ग्रंथालय तसेच विधानभवनाच्या मागच्या बाजूस मोकाट कुत्रे सहज फिरताना दिसून येतात.

‘व्हीआयपी’ असतानादेखील दुर्लक्षविधानभवन परिसरात अनेक ‘व्हीआयपी’ मान्यवरांचा संचार असतो. अशा स्थितीत मोकाट कुत्र्यांमुळे त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

पक्ष कार्यालयाजवळदेखील ठिय्याकाही मोकाट कुत्र्यांनी चक्क काही पक्षांच्या कार्यालयाजवळच ठिय्या मांडला आहे. कार्यकर्ते व कर्मचारी उरलेसुरले अन्न कुत्र्यांना आणून टाकतात. त्यामुळे कुत्रे भटकत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन