शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वाघ देशी अन् नाव विदेशी?

By admin | Updated: March 30, 2016 03:07 IST

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘बिट्टू आणि श्रीनिवास’ या वाघोबांना बड्या अधिकाऱ्यांची दिलेली नामविशेषणे

वाघोबांचे नामकरण ‘खुशामती’साठीचउमरेड : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘बिट्टू आणि श्रीनिवास’ या वाघोबांना बड्या अधिकाऱ्यांची दिलेली नामविशेषणे केवळ ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या खुशामती करण्यासाठीच असल्याच्या प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहे. ‘लोकमत’ने नामकरणाचे हे प्रकरण उजेडात आणताच आता साहेबांच्या ‘लाडीगोडी’साठीच हे नामकरण करण्यात आल्याचे खुलेआम बोलल्या जात आहे.साहेब खूश असले की मग आपल्या आवडीनुसार कामे काढणे सोयीचे होते. आपल्यावर एखाद्या कारवाईचे काळे ढग घोंगाऊ लागलेच तर त्यातूनही साहेबांच्या आशीर्वादाने सुटका करून घेता येऊ शकते, हेच यामागील गणित असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते महेश तवले यांनी व्यक्त केले. विशेषत: या डोकेबाज व्यूहरचनेत स्थानिक वन अधिकारी वर्गासह ‘वन्यप्रेमी कम् दलाल’ यांचाही सहभाग असल्याचीही खमंग चर्चा आहे. आपल्याच मनमर्जीने सुरू असलेल्या वनविभागाची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येऊनदेखील कोणतीही कारवाई न होण्यामागे नामकरणाचे भावनिक नाते जोडले असल्याचीही जोड निसर्गप्रेमी देत आहेत. ही ‘फेअरी’ कोण?वाघांना दिलेली वीरप्पन, डेंडू, राष्ट्रपती, माई, गब्बर, माया, कॅटरिना, बाजीराव, श्रीनिवास, बिट्टू, जय, चांदी आदी नावे नागरिकांच्या ओळखीची वा त्यांना समजणाऱ्या नावांपैकी आहेत. तसेच नामकरणानुसार ‘श्रीनिवास आणि बिट्टू’ यांची आई म्हणजे ‘फेअरी’. तर प्रत्यक्षात ही फेअरी दोन अधिकाऱ्यांच्या कोणत्या नात्यातली असाही उलटा सवाल आता विचारला जात आहे. ‘फेअरी’ हे नाव विदेशी असल्याचीही चर्चा जोरावर आहे. फेअरी ही विदेशी बाला असेल तर मग तिचे नाव कुणी दिले. नाव देण्यामागे काय उद्देश. तिचा या अभयारण्याशी काय ‘संबंध’ असाही संतापजनक सवाल निसर्गप्रेमी करीत आहेत. वाघ देशी असले तरी नाव मात्र विदेशी देण्यात आल्याने या ‘इंटरनॅशनल’ नामकरणाला आता कऱ्हांडल्याच्या मातीतूनच विरोध दर्शविला जात आहे.