शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तलावात फेकून युवतीला जीवे मारण्याचा प्रयत्न

By admin | Updated: January 31, 2017 02:41 IST

प्रेमप्रकरणातून एका युवकाने त्याच्या मैत्रिणीला फुटाळा तलावात फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

प्रेमप्रकरणातून घडली घटना : आरोपी युवक गजाआड नागपूर : प्रेमप्रकरणातून एका युवकाने त्याच्या मैत्रिणीला फुटाळा तलावात फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी सौरभ बांबोर्डे याला अटक केली. सौरभ आणि पीडित युवती जरीपटक्यातील रहिवासी आहे. ते एकाच संस्थेत शिकतात. त्यांच्यात खूप दिवसांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यामुळे सौरभ युवतीला लग्न करण्यासाठी अनेक दिवसांपासून मागे लागला आहे. युवतीचा सारखा नकार मिळत असल्याने सौरभला भलताच संशय आला. या पार्श्वभूमीवर, सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास पीडित युवती आपल्या मित्रांसोबत फुटाळा तलावावर आली. ते तेथे गंमतजंमत करीत असताना सौरभ पोहचला. त्याला पाहून युवती भांबावली. त्यानंतर हे दोघे काही अंतरावर चर्चा करू लागले. सूत्रांच्या माहितीनुसार, सौरभने पुन्हा लग्नाचा विषय काढला. तिने नकार देताच सौरभने तिला धक्का देऊन तलावात पाडले. तिच्या पाठोपाठ सौरभनेही उडी मारली. या अनपेक्षित घडामोडीमुळे युवतीसोबत आलेल्या मित्रांनी तलावात उड्या घेतल्या. त्यांनी आजूबाजूच्यांच्या मदतीने दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर युवतीला घेऊन तिचे मित्र निघून गेले. दरम्यान, या घटनेचा बोभाटा झाल्याने अंबाझरी पोलीस पथक पोहचले. त्यांनी चौकशी केली असता सौरभ तसेच त्या युवतीचे नाव आणि पत्ता कळला. त्यानंतर जरीपटका पोलिसांच्या मदतीने युवतीचा शोध घेण्यात आला. सायंकाळी याप्रकरणी युवतीची तक्रार नोंदवून पोलिसांनी आरोपी सौरभला हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात अटक केली.(प्रतिनिधी)