शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

भीमबेटका कातळशिल्पांवर डिकिनसोनिया जीवाश्माचा रोमांच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST

नवे संशोधन : ५७ कोटी वर्षांहून अधिक असू शकते भारतीय उपखंडाचे वय लोकमत विशेष लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

नवे संशोधन : ५७ कोटी वर्षांहून अधिक असू शकते भारतीय उपखंडाचे वय

लोकमत विशेष

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भोपाळजवळच्या भीमबेटका गुफांमधील कातळशिल्पांमध्ये सापडलेल्या डिकिनसोनिया जीवाश्मामुळे भारतीय उपखंडाची भूपृष्ठरचना ५५ ते ५७ कोटी वर्षे जुनी असावी, असा रोमांचित करणारा नवा अंदाज समोर आला आहे. ऑस्ट्रेलिया, युक्रेन, रशिया व चीननंतर केवळ भारतात डिकिनसोनिया जीवाश्म आढळल्यामुळे भूवैज्ञानिक आनंदित झाले असून, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया-जीएसआय) संस्था त्याचा अधिक सखोल अभ्यास हाती घेण्याच्या तयारीत आहे.

भीमबेटका समूहातील ऑडिटोरियम गुफेत, जमिनीपासून ११ फूट उंचीवर एका मोठ्या खडकावर १७ इंच लांबीचे हे अंडगोलाकृती जीवाश्म जगभरातील भूवैज्ञानिकांच्या एका चमूला गेल्या वर्षी फेब्रुवारीत आढळले. जीएसआयचे संचालक रणजीत खंगर व मेराजुद्दीन खान, अमेरिकेतील ग्रेगरी रेटालॅक व नेफ्री मॅथ्यूज, दक्षिण आफ्रिकेतील शरद मास्टर यांचे केवळ छायाचित्रावर अद्ययावत तंत्रज्ञान वापरून काढलेल्या निष्कर्षाचे ते संशोधन नुकतेच गोंडवाना रिसर्च या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाल्यानंतर, गेला आठवडावर त्यावर जगभर चर्चा सुरू आहे. गाेंडवाना रिसर्च ही बीजिंग येथील चीन विद्यापीठातील भूविज्ञान विभागाकडून प्रकाशित होणारी संशोधन पत्रिका असून, मूळ भारतीय एम.संतोष यांच्यासोबत चीन, इटली, स्वीत्झर्लंड, द.कोरिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, रशिया, आयर्लंड व द.आफ्रिकेतील संशोधक तिच्या संपादक मंडळात आहेत.

मार्च, २०२० मध्ये ३६वी आंतरराष्ट्रीय भूवैज्ञानिक परिषद नवी दिल्लीत होणार होती. ५६ वर्षांनंतर तिचे यजमानपद भारताकडे आले होते, परंतु कोरोना महामारीमुळे परिषद रद्द झाली. आता ती पुढच्या ऑगस्टमध्ये दिल्लीतच होणार आहे. परिषद रद्द झाली, तरी महत्त्वाच्या स्थळांना भूवैज्ञानिकांच्या भेटी झाल्या. त्यापैकी एक भेट भीमबेटकाची होती. तथापि, ज्या ऑडिटोरियम गुफेत डिकिनसोनिया फॉसिल जीवाश्म सापडले तिथे संशोधक अचानक गेले.

बहुपेशीय प्राणीसृष्टीचा पहिला आविष्कार

डिकिनसोनिया जीवाश्माचे भूविज्ञानात मोठे महत्त्व आहे. पृथ्वीच्या साडेचार अब्ज वर्षांच्या आयुष्यातील बॅक्टेरिया, एकपेशी जीव ते बहुपेशी जीव या प्रवासात हे जीवाश्म हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, त्याला इडियाकारान काळ म्हणतात. डिकिनसोनिया जीवाश्माचा पहिला शोध ऑस्ट्रेलियाचे रेड स्प्रिग यांनी दक्षिण ऑस्ट्रेलियातील इडियाकारा टेकड्यांमध्ये रेड स्प्रिग यांनी लावला. त्यांचे खातेप्रमुख, खनिज संचालक बेन डिकिन्सन यांच्या नावावरून जीवाश्माला ते नाव पडले. बहुपेशीय प्राणीसृष्टीचा हा पृथ्वीवरील पहिला आविष्कार मानला जातो. सुरुवातीला डिकिनसोनिया ही वनस्पती किंवा बुरशीचा प्रकार मानला जात होता. तथापि, त्यात कोलेस्टोरॉल आढळल्याने ताे बहुपेशीय प्राणी होता, हे नंतर स्पष्ट झाले. एखादे झाडाचे पान वहीत ठेवल्यानंतर कालांतराने त्याचे जे जाळीदार स्वरूप तयार होते, तसे हे जीवाश्म दिसते. अवघ्या काही मिलीमीटरपासून १.४ मीटर लांबीचे, मिलीमीटरच्या शतांश भागापासून ते काही मिमीपर्यंत जाडीचे हे जीवाश्म केवळ खडकांवर छापाच्या रूपात आढळले आहे. जिथे डिकिनसोनिया जीवाश्म सापडले ते भूभाग पृथ्वीतलावरील सर्वांत जुन्या, ८० ते ९० कोटी वर्षे जुन्या भूसंरचना समजल्या जातात.

भीमबेटकाचेही आयुष्य वाढले

भीमबेटका गुफा किंवा तिथली कातळशिल्पे हे भोपाळच्या आग्नेयेला ४५ किलोमीटरवरील आंतराष्ट्रीय वारसास्थळ असून, माणसे, पशुपक्षी, अगदी अस्वल, बैल व हत्तीचे मिश्रण असलेल्या विचित्र प्राण्यांपासून ते नर्तकी, शिकारी, लढाया असे दहा हजार वर्षांपूर्वीच्या लोकजीवनाचे सारे दर्शन कातळशिल्पाच्या रूपाने तिथे आहे. प्रारंभ, मध्य व नव अशा अश्मयुगाच्याच विविध टप्प्यांवर ती चित्रे रेखाटण्यात आली असावीत आणि हा कालखंड साधारणपणे दहा ते पस्तीस हजार वर्षांपूर्वीचा असावा, असे मानले जाते. पृथ्वीतलावर शेतीचाही शोध त्याचदरम्यान लागला, पण जीवाश्म अभ्यासकांनी शोधलेल्या डिकिनसोनिया जीवाश्माने या वारसास्थळाचे भूशास्त्रीय वय तब्बल ५५ ते ५७ कोटी वर्षांपर्यंत मागे गेले आहे.

-------------------------

चौकट...

भीमबेटकाच्या आधी डिकिनसोनियाचा शोध

- सर्वप्रथम दक्षिण ऑस्ट्रेलियातील फायन्डर्स पर्वतरांगांमध्ये

- युक्रेनमध्ये पोडोलिया भागातील निस्टर नदीखोऱ्यात

- रशियात धवल समुद्राच्या (व्हाइट सी) परिसरात

- दक्षिण चीनमध्ये यांगत्झे नदीखोऱ्यातील प्रसिद्ध थ्री गॉर्जेस धरण भागात

--------------------------------------