शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आपली बसच्या तीन हजार कर्मचाऱ्यांना वेतन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 20:35 IST

लॉकडाऊन कालावधीत शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाईल, अशी घोषणा केंद्र व राज्य सरकारने केली आहे. असे असतानाही महापालिकेतील आपली बसच्या ३ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून प्रतीक्षा : कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊन कालावधीत शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाईल, अशी घोषणा केंद्र व राज्य सरकारने केली आहे. असे असतानाही महापालिकेतील आपली बसच्या ३ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.आपली बस सेवेत कंडक्टर, चालक, तिकीट तपासनीस व विविध पदांवर तीन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाºयांना दर महिन्याला दहा तारखेपर्यंत वेतन मिळते. मात्र लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून बससेवा बंद आहे. मनपाच्या परिवहन विभागाने कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकाची फाईल वित्त विभागाकडे सादर केली. मात्र ‘नो वर्क नो पेमेंट’ अशी भूमिका वित्त विभागाने घेतली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सदर्भात अधिक माहितीसाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.परिवहन विभागाकडे निधी उपलब्धकर्मचाऱ्यांना वेतन देता यावे यासाठी परिवहन विभागाने १४ कोटींचा निधी ठेवला आहे. परंतु काम बंद असल्याने वित्त विभागाने वेतन देण्यास नकार दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे लॉकडाऊन कालावधीत तीन हजारांहून अधिक कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक