लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : तरुणास अडवून मारहाण करीत त्याच्याकडील माेटारसायकल, माेबाईल व राेख रक्कम हिसकावून पळ काढणाऱ्या तीन चाेरट्यांना कामठी (नवीन) पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एकूण ३० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून, चाेरट्यांचा छडा सीसीटीव्ही कॅमेेरा फुटेजमुळे लागल्याची माहिती ठाणेदार संजय मेंढे यांनी दिली. ही कारवाई साेमवारी (दि. २२) दुपारी करण्यात आली.
अरबाज खान जब्बार खान (वय १९), अरबाज खान ऊर्फ सोनू दुलेखान (२०) व फरदीन खान समसुद्दीन खान (तिघेही, रा. रामगड, कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. मिलिंद दशरथ कनोजिया (२५, रा. डाळ ओळी, कामठी) हा माेटरसायकलने (एमएच-४०/एपी-७२६५) मित्रासाेबत रविवारी (दि.२१) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पेट्राेल भरण्यासाठी पेट्राेलपंपकडे जात हाेता.
दरम्यान, या तिघांनी त्याला कामठी शहरातील जयस्तंभ चाैकात अडविले आणि मारहाण करीत त्याच्याकडून माेटारसायकल, माेबाईल व राेख रक्कम हिसकावून घेत पळ काढला. त्यामुळे मिलिंदने लगेच पाेलिसांत तक्रार दाखल केली. पाेलिसांनी या भागातील सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजची तपासणी केली. दुसरीकडे, तिघेही रनाळा-भिलगाव राेडवर फिरत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यामुळे पाेलिसांनी ते ठिकाण गाठून तिघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देताच त्याला अटक केली आणि त्यांच्याकडून एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार संजय मेंढे यांनी दिली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई दुय्यम पाेलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, कॉन्स्टेबल मनोहर राऊत, प्रमोद वाघ, नीलेश यादव, रोशन पाटील, ललित शेंडे यांच्या पथकाने केली.