शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

अभियंत्यासह तिघांना चिरडले

By admin | Updated: December 3, 2015 03:20 IST

अनियंत्रित ट्रक आणि टिप्परने तीन तासात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अभियंत्यासह तिघांचे बळी घेतले.

हुडकेश्वर-खरबीमध्ये अपघात : पत्नीचा मृत्यू, पती गंभीरनागपूर : अनियंत्रित ट्रक आणि टिप्परने तीन तासात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अभियंत्यासह तिघांचे बळी घेतले. या घटना हुडकेश्वर आणि नंदनवन येथे घडल्या. पहिली घटना बुधवारी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास हुडकेश्वर येथे घडली. महेंद्र हरिचंद्र बारसागडे (४०) रा. वृंदावन अपार्टमेंट हुडकेश्वर असे मृताचे नाव आहे. मृत बारसागडे हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता होते. ते गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे कार्यरत होते. प्रकृती बिघडल्याने ते तीन दिवसांपूर्वीच नागपुरात आले होते. प्रकृतीत सुधार झाल्याने त्यांनी मंगळवारी सकाळी ड्युटीवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना सकाळी ६.३० वाजता रवाना व्हायचे होते. परंतु वेळेवर झोप न उघडल्याने त्यांना उशीर झाला. त्यामुळे ते ड्युटीवर जाऊ न शकल्याने घरीच थांबले. ते पत्नी अंजलीला चौकातून जाऊन येतो असे सांगून घरून निघाले. सकाळी ९.४५ वाजता चौकातून खर्रा खाऊन परत येत असताना संजय गांधी खदान चौकातून ते डाव्या बाजूला वळत असताना म्हाळगीनगर चौकाकडून उदयनगर चौकाकडे येणाऱ्या एका भरधाव ट्रकने (एमएच/४०/वाय/८५३० ) त्यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या अपघातामुळे संतापलेल्या नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. पोलीस ठाणे जवळच असल्याने पोलिसही लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृताच्या कार्यालयात सूचना दिली. त्यानंतर कुटुंबीयांना माहिती मिळाली. त्यांच्या कुटुंबीयात पत्नी आणि ७ वर्षांची मुलगी श्रावणी आहे. त्यांचे आई-वडील चंद्रपूरला राहतात. लहान भाऊ करमचंद खासगी कंपनीत काम करतो. दुसरी घटना दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास नंदनवन पोलीस ठाणे हद्दीतील खरबी चौकात घडली. आॅटोचालक राकेश माहुर्ले सवारी बसवून खरबी चौकातून जात होता. त्याच्या आॅटोमध्ये रामजी शुक्ला (६०) व त्यांची पत्नी सूर्जकली (५५) रा. जय जलारामनगर खरबी, शैला सुखदेव भांगे (४५), नारायण रहांगडाले (७०) आणि एक इतर वृद्ध महिला होती. राकेश नारायण कॉलनीतून आॅटो घेऊन मुख्य रस्त्यावर आला.