शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील तीन जण विहिरीत पडले; मानकापुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 14:57 IST

घराजवळच्या विहिरीजवळची जमिन अचानक खाली गेल्यामुळे २ वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले.

ठळक मुद्दे घराजवळच्या विहिरीजवळची जमिन अचानक खाली गेल्यामुळे २ वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले.आज सकाळी ११.१५ च्या सुमारास मानकापूरच्या गायत्रीनगरात ही घटना घडली.चौघांना बाहेर काढण्यात आले. पण मुलाला विहिरीतून बाहेर काढणाचे प्रयत्न सुरू आहेत. 

नागपूर, दि.31- घराजवळच्या विहिरीजवळची जमिन अचानक खाली गेल्यामुळे २ वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले. त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आणखी दोघे विहिरीत अडकून पडले. आज सकाळी ११.१५ च्या सुमारास मानकापूरच्या गायत्रीनगरात ही घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चौघांना बाहेर काढण्यात आले. पण मुलाला विहिरीतून बाहेर काढणाचे प्रयत्न सुरू आहेत. 

गायत्रीनगर झिंगाबाई टाकळीत राजेश कुंभारे यांचे घर आहे. तेथे दीड वर्षांपासून सुधीर चौधरी यांचा परिवार भाड्याने राहतो. घराच्या अंगणात विहिर आहे.  सुधीर यांची पत्नी सुरेखा, सुरेखांच्या मावशी मंदाताई महाजन (वय ६०) आणि दोन वर्षांचा चिमुकला अंकुश या विहिरीजवळ बसून होते. जमीन पावसामुळे भुसभुशीत झाली असल्यामुळे अचानक ही जमीन खाली गेली. त्यामुळे अंगणात (विहिरीच्या बाजुला) गप्पा करीत असलेल्या  सुरेखा, मंदाताई आणि अंकुश विहिरीत पडले. मोठा आवाज आल्यामुळे घरात बसलेले सुधीर चौधरी आणि त्यांचे वडील यादवराव चौधरी (वय ७०) धावले. त्यांना पोहणे येत असल्यामुळे त्यांनी सुरेखा आणि मंदाताई यांना बाहेर काढले. चिमुकला अंकूश मात्र त्यांच्या हाती लागला नाही. विहिरीच्या आजुबाजूची जमिन पोकळ असल्यामुळे अंकूशला शोधण्याच्या प्रयत्नात सुधीर आणि त्यांचे वडीलही चिखलात फसले. दरम्यान, आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. कर्णोपकर्णी वा-यासारखी या घटनेची माहिती परिसरात पसरली. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली. मोठ्या संख्येत नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना बोलविले.   अग्निशमन दलाचा ताफा आणि मानकापूर पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी बचाव कार्य सुरू केले.  दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर सुनील चौधरी व त्यांच्या वडिलांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले. तत्पूर्वी, सुरेखा आणि मंदाताई यांनाही बाहेर काढण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. दरम्यान, चिमुकल्या अंकुशचा शोध घेणे सुरू होते. त्याला बाहेर काढण्यासाठी मोठमोठे पंप लावून संपूर्ण पाणी बाहेर फेकण्यात आले. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने मलबाही बाहेर फेकण्यात आला. मात्र, अंकुश हाती लागला नव्हता. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.