शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

चार कोटींच्या घोटाळ्यातील तिघांना जामीन नाकारला

By admin | Updated: May 7, 2015 02:14 IST

पाचपावली येथील सिंधी हिंदी हायर सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीतील ४ कोटी १७ लाख ७५ हजाराच्या...

नागपूर : पाचपावली येथील सिंधी हिंदी हायर सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीतील ४ कोटी १७ लाख ७५ हजाराच्या घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एस. तरारे यांच्या न्यायालयाने तीन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. जयंत विशनदास तोलानी (५९) रा. कृषी ले-आऊट जरीपटका, हुंदराज माणिकराय ताराणी (५४) रा. हुडको कॉलनी जरीपटका आणि भागचंद अर्जुनदास चेलानी (६२) रा. हिंगणा टी पॉर्इंट अंबाझरी, अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी २००१ पासून या संस्थेत घोटाळा केला. त्यांनी हिशेबाचे बनावट दस्तऐवज तयार करून त्याचा वापर करून संस्थेच्या सुमारे ४०० सदस्यांच्या ४ कोटी १७ लाख ७५ हजार २४५ रुपयाच्या रकमेचा घोटाळा केला. निशा होलाराम मेठवानी यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी १० सप्टेंबर २००९ रोजी गुन्हा दाखल केला होता. या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेला. पोलीस निरीक्षक एस.पी. मदने हे तपास करीत आहेत. या आरोपींना १६ एप्रिल २०१५ रोजी अटक करण्यात आली. ते सध्या कारागृहात आहेत. यापूर्वी त्यांनी अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो ३ आॅक्टोबर २०१३ रोजी फेटाळण्यात आला होता. आरोपींपैकी जयंत तोलानी याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. तो ३० नोव्हेंबर २०१३ रोजी फेटाळण्यात आला होता. अटकेनंतर आरोपींनी केलेला जामीन अर्जही फेटाळण्यात आला. सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. श्याम देवाणी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)