शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

८० लाखांचा कर माफ करण्यासाठी मागितले तीन लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:09 IST

महापालिकेचा करसंग्राहक आणि कंत्राटी सुपरवायझर जेरबंद : एसीबीने ठोकल्या बेड्या लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ८० लाखांचा कर माफ ...

महापालिकेचा करसंग्राहक आणि कंत्राटी सुपरवायझर जेरबंद : एसीबीने ठोकल्या बेड्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ८० लाखांचा कर माफ करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या महापालिकेच्या एका करसंग्राहक तसेच कंत्राटी सुपरवायझरला एसीबीच्या पथकाने आज जेरबंद केले. करसंग्राहक सूरज सुरेंद्र गणवीर (रा. भंडारा मोहल्ला, इंदोरा) आणि सुपरवायझर रवींद्र भाऊराव बागडे (रा. गणेश नगरी अपार्टमेंट कोराडी) अशी त्यांची नावे आहेत. जरीपटका येथील रामचंद्र जेठाणी यांचे आसीनगर झोनमध्ये गंगोत्री रिसॉर्ट अँड लॉन आहे. आरोपी गणवीर आणि बागडे या दोघांनी संगनमत करून ७ एप्रिलला जेठाणी यांना करासंदर्भात नोटीस बजावली होती. त्यानंतर २८ एप्रिलला त्यांनी ८० लाखांचा मेमो दिला. कोरोनामुळे वर्षभरापासून लॉन बंद असल्याच्या स्थितीत आहे. अशात एवढ्या प्रचंड रकमेचा कर निर्धारित केल्यामुळे जेठाणी यांनी गणवीर आणि बागडेशी संपर्क साधला. त्यांनी हा कर माफ करण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी केली. सद्यस्थिती आणि आर्थिक स्थितीचा हवाला देऊन तेवढी रक्कम भरणे शक्य नसल्याचे जेठाणी म्हणाले. त्यामुळे आरोपी तीन लाख रुपयांच्या लाचेवर आले. लाच दिल्यास संपूर्ण प्रकरण मार्गी लावू, असेही गणवीर आणि बागडेने जेठाणीना सांगितले. त्यापेक्षा एक रुपया कमी चालणार नाही, असेही म्हटले. एवढी मोठी लाच देण्याची इच्छा नसल्याने आज सकाळी एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांची भेट घेतली. त्यांना तक्रार देऊन गणवीर आणि बागडेच्या त्रासातून सोडविण्याची विनंती केली. अधीक्षक नांदेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून लगेच तक्रारीची शहानिशा करून घेतली. तक्रार खरी असल्याने लाचेचा सापळा रचला. ठरल्याप्रमाणे जेठाणी यांनी त्यांच्या हेमू कॉलनी चौकातील निवासस्थानी आरोपींना लाचेची रक्कम घेण्यासाठी बोलावले. तेथे रक्कम हाती घेताच एसीबीच्या पथकाने गणवीर आणि बागडेच्या मुसक्या बांधल्या.

या कारवाईची माहिती महापालिकेत कळताच एकच खळबळ उडाली.

---

कार्यालय आणि निवासस्थानाची झडती

या कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने गणवीर आणि बागडेच्या घरी तसेच कार्यालयात झडती सुरू केली. वृत्त लिहिस्तोवर त्यात काय मिळाले, हे स्पष्ट झाले नव्हते. अधीक्षक रश्मी नांदेडकर आणि अतिरिक्त अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक शशिकांत पाटील, निरीक्षक विनोद आडे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

----

मोठे रॅकेट सक्रिय

कराची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवून नंतर सेटलमेंटच्या नावाखाली संबंधित व्यक्तीकडून मोठी रक्कम उकळण्याचा गोरख धंदा गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेच्या कर विभागात सुरू आहे. त्यासाठी एक रॅकेटच सक्रिय आहे. एसीबीच्या पथकाने कसून चौकशी केल्यास या प्रकरणात अनेक मोठे मासे अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---