शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या नावावर तीन लाखाची फसवणूक

By admin | Updated: January 18, 2016 02:48 IST

एका मोठ्या कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जरीपटका येथील एका तरुणाला तीन लाख रुपयानी फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मोठ्या कंपनीचे दिले नियुक्ती पत्र : भाऊ व आईच्या खात्यात जमा करायला लावले पैसेनागपूर : एका मोठ्या कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून जरीपटका येथील एका तरुणाला तीन लाख रुपयानी फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मागील आठ महिन्यांपासून नोकरी न लागल्याने आणि तीन लाख रुपयेसुद्धा परत न मिळाल्यामुळे पीडित तरुणाने पोलीस उपायुक्तांकडे लिखित तक्रार दाखल केली. मंगेश नागदेवे असे पीडित तरुणाचे नाव आहे. यासंदर्भात त्याने जरीपटका पोलीस ठाण्यात लिखित तक्रार देऊनही पोलिसांनी आरोपी चेतनला ठाण्यात बोलावून साधी विचारपूससुद्धा केलेली नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी तो गेल्या १० दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. तक्रारकर्त्या मंगेशने दिलेल्या माहितीनुसार आरोपी युवक चेतनचे वडील दिलीप हे पोलीस विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे आरोपी चेतनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. मंगेशने सांगितले की, त्याच्या एका मित्राच्या माध्यमातून तो आरोपी चेतन (३२) रा. सुगतनगर चौक याला ओळखत होता. एप्रिल २०१५ मध्ये चेतनने मंगेशला सांगितले की, त्याची एका मोठ्या कंपनीतील अधिकाऱ्यांशी चांगली ओळख आहे. त्यामुळे तो कुणालाही नोकरी लावून देऊ शकतो. त्यामुळे मंगेशचा लहान भाऊ निशांतला नोकरी लावून देण्याचे आमिषही त्याने दाखविले. २६ मे २०१५ रोजी कंपनीचे नियुक्ती पत्र त्याच्या हाती दिले आणि २५ जून २०१५ रोजी कंपनीच्या चेन्नई येथील मुख्यालयात मुलाखतीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगितले. तसेच सत्यजित सपकाळ हे मुख्यालयाचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांचा नंबर दिला आणि तीन लाख रुपयाची मागणी केली. ही रक्कम मंगेशने आरोपी चेतनची आई व लहान भावाच्या खात्यात जमा केली. २४ जून रोजी मुलाखत होणार होती. तो दिवस निघून गेला. तेव्हा आरोपीने २५ जुलै रोजी मुलाखतीसाठी चेन्नईला बोलावल्याचे सांगितले. आरोपी जुलै ते आॅगस्ट २०१५ पर्यंत टाळाटाळ करू लागला. शेवटी मंगेश चेतनच्या घरी जाऊन पैसे परत करण्याचा तगादा लावला. त्यामुळे चेतनने धनादेश दिला. परंतु तो बाऊन्स झाला. त्यानंतर अनेकदा त्याने चेक दिले, परंतु ते सर्व बाऊन्स झाले. १३ आॅक्टोबर २०१५ रोजी ७३ हजार रुपये रोख परत केली आणि उर्वरित सव्वादोन लाख रुपये लवकरच परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु अजूनपर्यंत पैसे परत केले नाही. (प्रतिनिधी)