शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

क्वॉलिसच्या धडकेत तिघे जखमी

By admin | Updated: October 25, 2014 02:38 IST

सुसाट क्वॉलिसने रोडच्या कडेला असलेल्या पानटपरी, खांब व तवेराला एका पाठोपाठ एक धडक दिली.

मौदा : सुसाट क्वॉलिसने रोडच्या कडेला असलेल्या पानटपरी, खांब व तवेराला एका पाठोपाठ एक धडक दिली. यात तिघे गंभीर जखमी झाले. पाच जण थोडक्यात बचावले. अप्रशिक्षित चालकामुळे हा प्रकार घडल्याचे काहींनी सांगितले. ही घटना मौदा शहरातील गरदेव मोहल्ल्यात शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.सुरेश सोनकुसरे (४०), भिवाजी तळेकार (४५) व हिरा राजेंद्र मानकर सर्व रा. गरदेव मोहल्ला, मौदा अशी जखमींची नावे आहेत. नामदेव लांजेवार रा. पारडी व राहुल गोपिचंद मस्के रा. मौदा हे दोघेही एमएच-३१/बीडी-२३३३ क्रमांकाच्या क्वॉलिसने आले आणि गरदेव मोहल्ल्यात थांबले. मागून मेटॅडोर आल्याने नामदेवने राहुलला चावी दिली आणि क्वॉलिस बाजूला करण्यात सांगितले. वास्तवात त्याला चारचाकी वाहन चालविता येत नव्हते. त्याने क्वॉलिस सुरू करताच ती रोडच्या कडेला उभ्या असलेल्या नामदेव व इतर दोघांच्या दिशेने येत असल्याचे लक्षात येताच ते दोघेही बाजूला झाल्याने बचावले. दरम्यान, क्वॉलिसने पानटपरीला धडक दिली. यात भिवाजीचा पाय फ्रॅक्चर झाला असून, सुरेशही जखमी झाला. पानटपरीचालक शिवराज लिमजे थोडक्यात बचावला. पुढे या क्वॉलिसने आंगणात चूल पेटवत असलेल्या हिरा मानकर हिला धडक दिला.त्यानंतर एमएच-४०/ए-७६६६ क्रमांकाच्या तवेराला जोरदार धडक दिली. हिरा मानकर हिच्यावर नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये व सुरेश सोनकुसरे मेयो रुग्णालयात तसेच भिवाजी तळेकार याच्यावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. संतप्त जमावाने चालकास पकडून चांगलाच चोप दिला. त्याच्यासोबत असलेली मंडळी पळून गेली होती. माहिती मिळताच मौदा पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चालकालला ताब्यात घेतले व जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली. याप्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३३८, सहलकम १८४ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास मौदा पोलीस करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)