शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच वेळी तीन मैत्रिणी बेपत्ता

By admin | Updated: June 25, 2017 01:51 IST

एकाच वस्तीत राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुली घरून निघून गेल्या. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस

शाळकरी विद्यार्थिनी : सोनेगावमध्ये खळबळ, अपहरणाचा गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकाच वस्तीत राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुली घरून निघून गेल्या. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोनेगावात खळबळ उडाली. बेपत्ता असलेल्या तीन मुलींपैकी दोन आठवीच्या विद्यार्थिनी (वय १३) आणि एक दहावीची विद्यार्थिनी (वय १५) आहे. सोनेगावच्या इंद्रप्रस्थनगरात आजूबाजूला राहणाऱ्या या तिघी मैत्रिणी आहेत. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता त्या घरून निघून गेल्या. नेहमीप्रमाणे बाहेर गेल्या असाव्या असे समजून पालकांनी फारसे लक्ष दिले नाही. सायंकाळ झाली तरी त्या परत आल्या नाही. त्यामुळे आजूबाजूला विचारपूस सुरू झाली. एकीने रागाच्या भरात आम्ही निघून जात आहो, असे सांगितल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर पालकांनी शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, मैत्रिणींकडे शोध घेऊनही त्यांचा पत्ता न लागल्याने पालकांनी सोनेगाव ठाण्यात सायंकाळी तक्रार नोंदविली. एकीने घरच्या रागावर तर दुसरीने घरी मन लागत नसल्यामुळे पळ काढल्याची चर्चा आहे. एकसाथ तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने पोलिसांनीही लगेच शोधाशोध सुरू केली. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, बेपत्ता मुलींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सोनेगावचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी दिली. दिल्लीकडे गेल्याचा संशय या मुली दिल्लीकडे गेल्या असाव्या, असा संशय आहे. कारण घरून त्या रेल्वेस्थानकावर गेल्या आणि तेथून त्यांनी तिकीट घेतल्यानंतर पळतच फलाटावर उभी असलेली रेल्वेगाडी पकडली. ज्या वेळेचे हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्यावेळी दिल्लीकडे जाणारी रेल्वेगाडी पहिल्या फलाटावर उभी होती, असे समजते. दरम्यान, तीनही मुलींच्या घरची स्थिती अत्यंत गरिबीची आहे. त्यामुळे त्यांना प्रवासाला जाण्यासाठी पैसे कुणी दिले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रश्नामुळेच त्या तिघींना कुणी फूस लावून पळण्यास बाध्य केले असावे, असा कयास बांधला जात आहे.