शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

By admin | Updated: May 28, 2015 02:20 IST

मौदा तालुक्यातील तारसा येथील बॅण्ड पार्टीला नागपूरला घेऊन येत असलेल्या टाटासुमोला विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.

कन्हान : मौदा तालुक्यातील तारसा येथील बॅण्ड पार्टीला नागपूरला घेऊन येत असलेल्या टाटासुमोला विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात टाटासुमोतील दोघांचा घटनास्थळीच तर, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर, अन्य सात जण गंभीर जखमी झाले. त्यातील तिघे अत्यवस्थ असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. धडक एवढी भीषण होती की, टाटासुमो उलटून ती ट्रकच्या समोरच्या चाकांमध्ये फसली होती. हा अपघात पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हान - तारसा मार्गावरील नीलज गावाजवळ बुधवारी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास झाला. टाटासुमोचालक गणपत रामाजी हरकंडे (२८, रा. रेवराळ, ता. मौदा) व राष्ट्रपाल सुखराम बावणे (२७), कुवरचंद लाडेकर अशी मृतांची नावे असून, जखमींमध्ये जितेंद्र ताराचंद लाडवे (२७), रामा जगत हरकंडे (५०, रा. रेवराळ, ता. मौदा), मदन केशव लेंडे (४२), गणेश मारोतराव शेंडे (३०), राजू सोनवणे, पंकज सुखराम बावणे आणि बबन टेबे या आठ जणांचा समावेश आहे. यातील तिघे अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. मौदा तालुक्यातील तारसा (रेल्वे स्टेशन) येथील संपत हरकंडे याचा लग्नसोहळा नागपूर येथे होता. त्यामुळे गणपत हरकंडे यांची एमएच-३१/झेड-६३५ क्रमांकाची टाटासुमो किरायाने घेण्यात आली होती. या टाटासुमोमध्ये बॅण्ड पार्टीतील सर्व सदस्य बसले होते. गणपत हरकंडे हे बॅण्ड पार्टीला घेऊन तारसा (रेल्वे स्टेशन) हून कन्हान मार्गे नागपूरला जायला निघाले. दरम्यान, नीलज शिवारातील ब्रिक्स कंपनीसमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच-४९/५०८ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने या टाटासुमोला जोरदार धडक दिली. यात टाटासुमो रोडलगत असलेल्या शेतात फेकल्या गेल्याने उलटली आणि ट्रकमध्ये अडकली. अपघाताच्या आवाजामुळे शेतातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लगेच कन्हान पोलिसांना सूचना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. नागरिकांनी टाटासुमोतील नऊ जणांना बाहेर काढले. गणपत हरकंडे मात्र आत फसले होते. त्यांना बाहेर काढण्यास वेळ लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सर्व जखमींना लगेच नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. त्यातच राष्ट्रपाल बावणे याचा मृत्यू झाला. कुवरचंद लाडेकर याचा उपचारादरम्यान मृत्यूमझाला. जखमींपैकी राजू सोनवणेसह अन्य एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ट्रकमध्ये फसलेली टाटासुमो ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. या घटनेमुळे लग्नमंडपात शोककळा पसरली होती. या टाटासुमोमध्ये मौदा तालुक्यातील कोदामेंढी, मांगली, राजोली व नरसाळा येथील मंडळी असल्याची माहिती जाणकारांनी दिली. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे. (शहर प्रतिनिधी)