शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूने एकाच दिवशी तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2015 03:02 IST

मेडिकलमध्ये स्वाईन फ्लूसाठी उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. यात एक स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह तर दोन संशयित रुग्ण होते.

मेडिकल : शिक्षकासह, महिला व वृद्धाचा समावेशनागपूर : मेडिकलमध्ये स्वाईन फ्लूसाठी उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. यात एक स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह तर दोन संशयित रुग्ण होते. स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून या वर्षी नागपूर विभागात १३७ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहे. दरम्यान, रविवारी पुन्हा एक रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या ६५३ वर गेली आहे. स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह असलेले मो. शब्बीर मुजफ्फर (३२) रा. चंद्रपूर, संशयीत रुग्ण सुनीता अशोक नेवारे (४०) रा. गोंदिया व बाबुराव बोमाजी वानखेडे (६७) रा. रामटेक असे मृताचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार मो. मुजफ्फर हे व्यवसायाने शिक्षक आहे. काही दिवस ते अमरावती येथील रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु येथे त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नागपूर मेडिकल रुग्णालयात हलविले. त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले होते. रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.स्वाईन फ्लू संशयित असलेले सुनीता नेवारे यांना गोंदिया जिल्हा रुग्णालयातून शुक्रवारी मेडिकलमध्ये पाठविण्यात आले होते. त्यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविले असून अद्यापही अहवाल प्राप्त झाला नाही. रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला, तर बाबुराव वानखेडे यांना शनिवारी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. दुपारी ३ वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या तिन्ही रुग्णांचे फुफ्फुस कमजोर झाले होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्याच्या स्थितीत मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात चार पॉझिटीव्ह तर तीन संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. (प्रतिनिधी)२५ खाटांच्या वॉर्डात व्हेंटिलेटर दोनस्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मेडिकलचा २५ क्रमांकाचा वॉर्ड केवळ स्वाईन फ्लू रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. २५ खाटांच्या या वॉर्डात मात्र दोनच व्हेंटिलेटर आहेत. रुग्णांची संख्या पाहता आणखी पाच व्हेंटिलेटर असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.मृत्यूच्या संख्येत घटराज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रुग्णांची संख्या तेवढीच असली तरी मृत्यूची संख्या कमी झाली आहे. नागपुरात या दोन्ही संख्या कमी झाल्या आहेत. गर्भवतींना देण्यात येत असलेल्या स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, खासगी पॅथॉलॉजी लॅबमधून कमी दरात स्वाईन फ्लूची चाचणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागपुरात यासाठी एक लॅब तयार झाली आहे. -डॉ. सतीश पवार, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग