शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एका नावाचे तीन ‘डेथ सर्टिफिकेट’

By admin | Updated: July 21, 2015 03:13 IST

मनपाच्या जन्म-मृत्यू विभागातर्फे माझ्या पतीच्या नावावर वेगवेगळ्या रजिस्ट्रेशन नंबरने तीनवेळा ‘डेथ सर्टिफिकेट’

नगरसेविका पाटणकर यांचा सभागृहात खुलासा : जीवाला धोका असल्याचीही व्यक्त केली शंका नागपूर : मनपाच्या जन्म-मृत्यू विभागातर्फे माझ्या पतीच्या नावावर वेगवेगळ्या रजिस्ट्रेशन नंबरने तीनवेळा ‘डेथ सर्टिफिकेट’ जारी करण्यात आले आहे, असा आरोप बसपाच्या नगरसेविका किरण पाटणकर (रोडगे) यांनी सोमवारी मनपाच्या आमसभेत केला.या संबंधातील पुरावेही त्यानी सभागृहात सादर केले. महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाने पतीच्या नावाने तीनवेळा वेगवेगळ्या नावाने मृत्यू प्रमाणपत्र दिले. या आधारे अर्ज केला नसतानाही परस्पर दुसऱ्याच्या नावाने मालमत्ता करण्यात आली. या बोगस नामांतराच्या आधारे लाखो रुपयांचे कर्ज उचलण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मागील पंधरा वर्षांपासून मनपा कार्यालयात या संदर्भात तक्रारी करीत आहे. परंतु न्याय मिळाला नाही. वेळीच न्याय मिळाला असता तर माझ्या पतीच्या नावावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर को-आॅपरेटिव्ह बँकेतून लाखो रुपयांचे बोगस कर्ज उचलण्यात आले नसते, असेही त्यांनी सांगितले.पाटणकर म्हणाल्या, माझ्या पतीला दरिया रोडगे नावाने लोक ओळखत होते. परंतु त्यांचे नाव प्रेमकुमार माणिकराव रोडगे होेते. याच नावाने ते बँक वा शासकीय व्यवहार करीत होते. शिक्षणही त्यांनी याच नावावर घेतले आहे. २८ नोव्हेंबर २००१ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी नामांतरणासाठी अर्ज केला नव्हता. असे असतानाही १८ आॅगस्ट २००१ ला किरण रोडगे नावाने नामांतर करण्यात आले. नामांतरण करण्यात आले त्यावेळी माझे पती गंभीर आजारी होते. मी माझे नाव किरण पाटणकर (रोडगे)असेच लिहिते. मृत्यू प्रमाणपत्रात वारंवार फेरबदलवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमाणपत्राच्या आधारे १२ डिसेंबर २००१ रोजी मनपाने मृत्यू प्रमाणपत्र दिले. यात दरिया माणिकराव रोडगे असे नाव लिहिले होते व जात महार दर्शविण्यात आली होती. ६ आॅगस्ट २००२ ला याच नावाने मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले. त्यात मात्र जात हिंदू दर्शविण्यात आली आहे. पाटणकर यांनी घाटावरील नोंदीनुसार ६ आॅगस्ट २०११ शपथपत्र तयार करून दरिया रोडगे यांच्या जागी प्रेमकुमार ऊर्फ दरिया माणिकराव रोडगे असे प्रमाणपत्र घेतले. त्यानंतरही दरिया माणिकराव रोडगे नावाने मनपाने मृत्यूप्रमाणपत्र दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.