शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

तीन भावांची निर्दोष सुटका

By admin | Updated: September 19, 2016 02:47 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका हत्याप्रकरणात मयताचे मृत्यूपूर्व बयान संशयास्पद ठरवून तीन सख्ख्या भावांना निर्दोष सोडण्याचा आदेश दिला.

हायकोर्ट : मृत्यूपूर्व बयान ठरले संशयास्पदनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका हत्याप्रकरणात मयताचे मृत्यूपूर्व बयान संशयास्पद ठरवून तीन सख्ख्या भावांना निर्दोष सोडण्याचा आदेश दिला.विनोद (२४), धर्मेंद्र ऊर्फ धम्मा (२७) व हरिश्चंद्र बाबुराव उमरेडकर (३२) अशी आरोपींची नावे असून ते नंदनवन झोपडपट्टी येथील रहिवासी आहेत. मृताचे नाव मिथुन होते. २२ फेब्रुवारी २०१२ रोजी आरोपींनी मिथुनला पेट्रोल टाकून जाळले असे पोलिसांचे म्हणणे होते. मिथुन ४२ टक्के जळाला होता. त्याचा १६ मार्च रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.सत्र न्यायालयाने २१ नोव्हेंबर २०१४ रोजी तिन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर, आरोपींचे वडील बाबुरावला निर्दोष सोडले होते. शिक्षा झालेल्या आरोपींनी या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांनी विविध बाबी लक्षात घेता आरोपींचे अपील मंजूर करून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. उच्च न्यायालयात मिथुनचे मृत्यूपूर्व बयान संशयास्पद तर, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे बयान महत्त्वहीन ठरले. या आधारावर आरोपींना शिक्षा देऊ शकत नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. आरोपींतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)