शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

संविधानाची मानवी मूल्ये धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:38 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मानवी मूल्ये दिली आहेत. परंतु आजच्या घडीला एकूणच परिस्थिती पाहता संविधानातील ही मानवी मूल्ये धोक्यात आली आहेत,

ठळक मुद्दे६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याला प्रारंभ : महिला परिषदेतील वक्त्यांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मानवी मूल्ये दिली आहेत. परंतु आजच्या घडीला एकूणच परिस्थिती पाहता संविधानातील ही मानवी मूल्ये धोक्यात आली आहेत, असा सूर दीक्षाभूमीवर आयोजित महिला परिषदेत निघाला.६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला दीक्षाभूमीवर बुधवारपासून सुरुवात झाली. प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिला परिषदेने याची सुरुवात करण्यात आली. कमलताई गवई या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या तर डॉ. जुल्फी शेख, पुष्पा बौद्ध, डॉ. सरोज आगलावे, रेखा खोब्रागडे, भुवनेश्वरी मेहरे प्रमुख वक्त्या होत्या.डॉ. सरोज आगलावे यावेळी बोलताना म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना मोठे अधिकार दिले आहेत. एक व्यक्ती एक मत आणि एक मूल्य हे तत्त्व म्हणजेच मानवी मूल्य होय, असेही त्यांनी स्पष्ट केले.रेखा खोब्रागडे म्हणाल्या भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आहे. संविधानात अनेक अधिकार दिले आहेत. हक्क आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संविधानात ते नमूद आहे. संविधानाच्या जनजागृतीची मोहीम नागपुरातून सुरू झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.डॉ. जुल्फी शेख यांनी आपल्याला एक धर्म आहे, त्याची एक भाषा आहे. त्याचा निर्माता आहे आणि मार्गदाता सुद्धा आहे. तेव्हा आपल्या धर्माची भाषा (पाली) अवगत करा आणि त्याची संस्कृती जपून एकजूट राहा, असे आवाहन केले. कमलताई गवई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संविधानावर प्रकाश टाकत बौद्ध महिलांनी एकजूट राहून कार्यरत राहण्याचे आवाहन केले. तक्षशीला वाघधरे यांनी संचालन केले. वंदना जीवने यांनी आभार मानले.बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे पालन करायावेळी पुष्पा बौद्ध म्हणाल्या आपण बौद्ध आहोत, त्यामुळे बौद्धासारखेच राहिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला २२ प्रतिज्ञा दिल्या आहेत. परंतु त्याचे पालन व आचरण होताना दिसून येत नाही. या २२ प्रतिज्ञा म्हणजेच बौद्ध धम्म होय, तेव्हा त्याचे पालन झालेच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.आजपासून धम्मदीक्षाधम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर लाखो लोक येतात. मागील काही वर्षांपासून दीक्षाभूमी स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमीवर धम्मदीक्षेचा कार्यक्रम सुरू केला आहे. याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळतो. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वातील भिक्खू गण बौद्ध धम्माची दीक्षा देतात. यंदा गुरुवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा कार्यक्रम सुरू होईल. ३० सप्टेंबरपर्यंत तो सुरू राहील. गुरुवारी सायंकाळी ‘भीमा तुझ्या जन्मामूळे’ हे नाटक सुद्धा सादर करण्यात येईल.आंबेडकरी अनुयायी दाखलधम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मुख्य सोहळा शनिवारी आहे. बुधवारपासून आंबेडकरी अनुयायांचे येणे सुरू झाले आहे. बीड, औरंगाबाद येथील अनुयायी बुधवारीच दीक्षाभूमीत दाखल झाले.