शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

रेल्वेस्थानकावर कोरोनाचा धोका; रेल्वे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 07:00 IST

Nagpur News railway station नागपूर रेल्वेस्थानकावर सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची वाहतूक सुरु आहे. येथे प्रवाशांमध्ये अंतर राहत नाही. अनेकजण मास्क घातलेले नसतात.

ठळक मुद्देप्रवाशांची नियमांकडे पाठ, नियम धाब्यावर

दयानंद पाईकराव/मुकेश कुकडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेत लॉकडाऊन नंतर सहा महिन्यांनी विशेष रेल्वेगाड्या सुरु झाल्या. कोरोनाचे नियम पाळून गाड्या सुरु करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने दिले. तरीसुद्धा नागपूर रेल्वेस्थानकावर सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची वाहतूक सुरु आहे. येथे प्रवाशांमध्ये अंतर राहत नाही. अनेकजण मास्क घातलेले नसतात. रेल्वेस्थानक परिसर, प्लॅटफार्म आणि रेल्वेगाड्यातही हे धक्कादायक चित्र पाहावयास मिळाले. अशा स्थितीत रेल्वेस्थानक तर कोरोनाचे कॅरिअर होणार नाही ना अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे.रेल्वे बोर्डाने रेल्वेगाड्या सुरु करताना काही नियम ठरवून दिले. यात प्रवाशांनी तोंडाला मास्क लावणे, आपसात दोन फुटांचे अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आदी नियमांचा समावेश आहे. परंतु नागपूर रेल्वेस्थानक परिसर, प्लॅटफार्म आणि रेल्वेगाड्यांमध्ये या नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे केवळ गाड्या सुरु करणे हेच रेल्वे बोर्डाचे ध्येय असून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी काहीच यंत्रणा नसल्याची बाब सिद्ध झाली. या बाबींमुळे रेल्वेच्या माध्यमातून कोरोनाचा झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता आहे.त्यामुळे केवळ गाड्या सुरु करणे हेच रेल्वे बोर्डाचे ध्येय असून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी काहीच यंत्रणा नसल्याची बाब सिद्ध झाली. या बाबींमुळे रेल्वेच्या माध्यमातून कोरोनाचा झपाट्याने प्रसार होण्याची शक्यता आहे.असे आहे चित्रनागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात प्रवासी दाटीवाटीने उभे होते. त्यांच्यात अर्ध्या फुटापेक्षाही कमी अंतर होते. प्लॅटफार्मवरील चित्र तर त्यापेक्षाही भयानक होते. गाडी येणार असल्यामुळे संपूर्ण प्लॅटफार्मवर प्रवासी घोळका करून उभे होते. लवकर गाडीत चढताना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचे भान कुणालाही नव्हते. कोचमध्येही प्रवासी एकमेकांना स्पर्श होईल असे बसलेले दिसले.रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भितीप्लॅटफार्म क्रमांक एकवर स्टेशन संचालक, उपस्टेशन व्यवस्थापक, रेल्वे सुरक्षा दल, टीसी, लोकोपायलट लॉबी, लोहमार्ग पोलीस ठाणे आदी कार्यालये आहेत. याच प्लॅटफार्मवर अनेक रेल्वेगाड्या येतात. या गाड्यांमध्ये प्रवास करणारा एखादा पॉझिटीव्ह प्रवासी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्यास संपूर्ण कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.रेल्वे प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावीरेल्वेस्थानकावर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही ही खरी बाब आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने टीसींची संख्या वाढविण्याची गरज आहे. प्लॅटफार्मवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी गस्त घालण्याची तसेच प्रशासनाने कठोर भूमिका घेत प्रवाशांना नियमांचे पालन करण्यासाठी बाध्य करावे.- बसंत कुमार शुक्ला, सचिव, भारतीय यात्री केंद्र

 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर