शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

- तर हजारो नागरिक मतदानापासून राहतील वंचित

By admin | Updated: February 21, 2017 01:54 IST

नागपूर महानगरपालिका निवडणुकांचे मतदान अगदी तोंडावर येऊन ठेपले असतानादेखील मतदार यादीसंदर्भातील संभ्रम संपलेला नव्हता.

मनपा, राजकीय पक्षांकडून ‘व्होटर स्लिप’ पोहोचल्या नाहीत : मतदान कुठे करणार?नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकांचे मतदान अगदी तोंडावर येऊन ठेपले असतानादेखील मतदार यादीसंदर्भातील संभ्रम संपलेला नव्हता. एकीकडे ‘आॅनलाईन’ शोधामध्ये नाव सापडत नसताना मनपा प्रशासन व राजकीय पक्षांकडूनदेखील अनेक मतदारांच्या घरी ‘व्होटर स्लिप’ पोहोचलेल्या नव्हत्या. त्यामुळे मंगळवारी नेमके मतदान कुठे करावे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. जर अशीच स्थिती कायम राहिली तर अनेक नागरिक लोकशाही प्रणालीतील सर्वात मोठे शस्त्र असलेल्या मतदानाचा प्रयोग करण्यापासून वंचित राहतील की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.एरवी मतदानापूर्वी उमेदवार मतदारांना ‘व्होटर स्लिप’चे वाटप करतात. परंतु यावेळी महापालिका प्रशासनाने यासाठी पुढाकार घेतला आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी महापालिका प्रशासनातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले. जनजागृतीसोबतच प्रथमच मतदारांना घरपोच मतदार स्लिप वाटपाचा उपक्रम राबविण्याची घोषणादेखील करण्यात आली. महापालिकेतर्फे मतदार यादीच्या आकाराचे स्लिप छापण्यात आले व शहरातील २० लाख ९३ हजार ३९२ मतदारांना या स्लिप घरपोच देण्यात येतील, असा दावादेखील करण्यात आला. ‘स्लिप’वर मतदाराचा फोटो, नाव व मतदान केंद्राचा क्रमांकाची माहिती देण्यात आली.शुक्रवारपासून याचे काम सुरू झाले व बऱ्याच ठिकाणी ‘व्होटर स्लिप’ पोहोचल्या. मात्र काही प्रभागांतील नागरिकांना या ‘स्लिप’ची प्रतिक्षाच आहे. सोमवारी उशीरापर्यंत नागरिकांपर्यंत मनपाकडून कुणीही पोहोचले नव्हते. त्यामुळे अनेक नागरिकांना मंगळवारी नेमके कुठे मतदान करावे, याची माहितीच नव्हती. विविध ठिकाणी त्यांच्याकडून विचारणा होत होती. ‘आॅनलाईन’देखील अनेकांची माहिती उपलब्ध नव्हती. संकेतस्थळावर नाव टाकूनदेखील मतदानकेंद्राची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मतदान करा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र त्यासाठी व्यवस्था उभारुन त्याची योग्य अंमलबजावणी का करण्यात येत नाही आणि असेच राहिले तर मतदानाची टक्केवारी कशी वाढणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.मतदानाच्या दिवशीदेखील होणार वाटपमतदानाच्या दिवशीदेखील होणार वाटपयासंदर्भात मनपाचे अप्पर आयुक्त रवींद्र कुंभारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काही ठिकाणी ‘व्होटर स्लिप’ पोहोचली नसल्याचे मान्य केले. मात्र युद्धपातळीवर हे काम सुरू असून मतदानाच्या दिवशीदेखील मतदारांना ‘व्होटर स्लिप’चे वाटप करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.एकाच वस्तीतआधे इधर, आधे उधर मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ आता समोर येऊ लागला आहे. उमेदवार मतदारांपर्यंत पोहचून त्यांचे मतदान कोणत्या केंद्रावर आहे याची माहिती देत आहे. उत्तर व पश्चिम नागपूरच्या सीमेवर कोराडी रोडला लागून धाम ही वस्ती आहे. या वस्तीमध्ये एका घरचे मतदार प्रभाग १ मध्ये तर दुसऱ्या घरचे मतदार प्रभाग ११ मध्ये आले आहेत. एकाच वस्तीत एकाच रांगेत राहणाऱ्या मतदारांची दोन वेगवेगळ्या प्रभागात विभागणी करण्यात आल्याने मतदारांमध्ये संभ्रम व कमालीचा रोष आहे. या उदाहरणामुळे मतदार यादीमध्ये असलेला घोळ मतदानापूर्वीच समोर आला आहे.