शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चार स्टेशन व्यवस्थापकांची होणार चौकशी

By admin | Updated: September 10, 2015 03:42 IST

बोरखेडी ते बुटीबोरीदरम्यान असलेल्या कृष्णा नदीत संपर्कक्रांती एक्स्प्रेसचा गार्ड पडून बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला होता.

कर्तव्यात कसूर : संपर्कक्रांती एक्स्प्रेसची घटना भोवणारनागपूर : बोरखेडी ते बुटीबोरीदरम्यान असलेल्या कृष्णा नदीत संपर्कक्रांती एक्स्प्रेसचा गार्ड पडून बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान त्यानंतर चार रेल्वेस्थानक ओलांडून ही गाडी आल्यानंतरही याबाबत एकाही स्टेशन व्यवस्थापकाने याबाबत नियंत्रण कक्षाला सूचना न दिल्यामुळे या स्टेशन व्यवस्थापकांची चौकशी करण्यात येणार आहे.बुधवारी रात्री संपर्कक्रांती एक्स्प्रेसमधील गार्ड कृष्णा नदीवर गाडी उभी असताना चेन पुलींग दुरुस्त करण्यासाठी गाडीखाली उतरला होता. दरम्यान गाडी पुढे नेण्याची सूचना या गार्डने लोकोपायलटला दिल्यामुळे गाडी पुढे नेण्यात आली. यात गाडीत बसताना संबंधित गार्डचा पाय घसरून तो नदीत पडला होता. कृष्णा नदीवरून गाडी सुटल्यानंतर बुटीबोरी, गुमगाव, खापरी, अजनी असे चार रेल्वेस्थानक रस्त्यात लागतात. येथील स्टेशन व्यवस्थापकांनी लोकोपायलट आणि गार्डला हिरवी झेंडी दाखविल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. परंतु ही गाडी कुणीच अटेंड न केल्यामुळे गाडीत गार्ड आहे की नाही याची माहितीच अखेरपर्यंत मिळाली नाही. नागपूरला ही गाडी आल्यानंतर या गाडीत चढणाऱ्या गार्डला गाडीत गार्ड नसल्याचे कळले आणि एकच खळबळ उडाली. दरम्यान गार्डबाबत सूचना न देणाऱ्या या चारही स्टेशन व्यवस्थापकांची चौकशी होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)काय आहे यंत्रणाकुठलीही गाडी एखाद्या रेल्वेस्थानकावरून जात असेल तर संबंधित स्थानकाच्या स्टेशन व्यवस्थापकास लोकोपायलट आणि गार्डला हिरवी झेंडी दाखवावी लागते. गाडीत गार्ड नसल्यास त्याची त्वरित रजिस्टरमध्ये नोंद करून नियंत्रण कक्षाला सूचना देणे क्रमप्राप्त ठरते. परंतु बुटीबोरी, गुमगाव, खापरी आणि अजनी येथील स्टेशन व्यवस्थापकांनी याबाबत काहीच न कळविल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने आखून देण्यात आलेल्या नियमांचा हा भंग झाला आहे.