शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिक्षण महाविद्यालयांचे संलग्नीकरण काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:23 IST

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेल्या शिक्षण महाविद्यालयांची संलग्नता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : महाविद्यालयांना नियमांची पूर्तता करणे अनिवार्यच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेल्या शिक्षण महाविद्यालयांची संलग्नता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून काढण्यात येणार आहे. याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधी अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.विद्यापीठांतर्गत सध्या ११९ बी. एड. व ५६ एम. एड. महाविद्यालये कार्यरत आहेत. ही महाविद्यालये संचालित करणाºया शिक्षण संस्था शिक्षक नियुक्तीचे निकष पाळत नाहीत, पण विद्यार्थ्यांना १०० टक्के प्रवेश देतात. तसेच, नागपूर विद्यापीठ विद्यार्थी प्रवेशाला मान्यताही देते. नियमांची पायमल्ली केली जात असताना कुणावरही कारवाई होत नाही, असा आरोप याचिकाकर्त्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात करण्यात आला होता. नियमांची पूर्तता न करणाºया महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्वत् परिषदेने आॅगस्ट महिन्यात ३३ महाविद्यालयातील बी.एड. व एम.एड. अभ्यासक्रमाचे संलग्नीकरण २०१७-१८ या वर्षासाठी खंडित करण्यात करण्याचा निर्णय घेतला. यासंबंधात विद्यापीठाने अधिसूचनादेखील प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयांत प्रवेश घेऊ नये. जर त्यांनी प्रवेश घेतला तर संबंधित महाविद्यालय व विद्यार्थ्याची ती जबाबदारी राहील, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले होते.याचिकाकर्त्याने न्यायालयात ९२ शिक्षण महाविद्यालयांचा मुद्दा उपस्थित केला होता. यातील ३३ चे संलग्नीकरण खंडित करण्यात आले आहे. मात्र उर्वरित ५९ महाविद्यालयांना विद्यापीठाने अगोदरच संलग्नीकरण प्रदान केले आहे. काहींना कायम संलग्नीकरण दिले होते तर काहींना २ ते ३ वर्षांसाठी संलग्नीकरण दिले होते. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेतर्फे एक वर्षाचे संलग्नीकरण दिले जाते. त्यामुळे नागपूर विद्यापीठात अशा महाविद्यालयांबाबत भूमिका ठरविण्यासाठी अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. शासनाच्या निर्णयाचा आधार घेत अशा सर्व महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.दरवर्षी घ्यावे लागणार संलग्नीकरणशासनाच्या निर्णयानुसार या महाविद्यालयांचे संलग्नीकरण काढणार आहोत व त्यांना दरवर्षी नव्याने संलग्नीकरण घ्यावे लागणार आहे. यासाठी त्यांना नियमांची पूर्तता करुन पाहणी समितीची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. नियमांची पूर्तता न करणाºया किंवा कुठलाही संपर्क न साधणाºया महाविद्यालयांना नोटीस पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.