शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ संघ स्वयंसेवकांचा निर्धार कायम

By admin | Updated: February 6, 2017 01:58 IST

मनपा निवडणुकांचे तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपासोबतच संघ परिवारात खळबळ माजली आहे.

नेत्यांच्या शिष्टाईला यश नाहीच : अनेक प्रभागांत संघ विरुद्ध भाजप लढाई नागपूर : मनपा निवडणुकांचे तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपासोबतच संघ परिवारात खळबळ माजली आहे. काही प्रभागांत भाजपा उमेदवारांसमोर उभ्या ठाकलेल्या संघ स्वयंसेवकांची मनधरणी करण्याचा विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आला. मात्र कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी मागे न घेण्याचा निर्धार संबंधित स्वयंसेवक उमेदवारांनी केला आहे. शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये संघ परिवारातील कार्यकर्त्यांना तिकिटांचे आश्वासन मिळाले होते. मात्र ऐनवेळी स्वयंसेवकांना डावलण्यात आले. त्यामुळे नाराज स्वयंसेवकांनी दुसऱ्या पक्षाची कास धरत किंवा थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करीत भाजपाला आव्हान दिले. यासंबंधात विविध नेत्यांनी या कार्यकर्ते व स्वयंसेवकांना संपर्क करीत उमेदवारी मागे घेण्यासंबंधात विनंती केली. मात्र बहुतांश जणांनी आपली उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्धार केला आहे. शहरातील १० हून अधिक जागांवर अशी स्थिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचारक रवींद्र जोशी यांच्या स्नुषा विशाखा जोशी या प्रभाग-१५ मधून शिवसेनेच्या तिकीटवरून निवडणूक लढणार आहेत. त्यांच्यामुळे भाजपाच्या उमेदवारांना फटका बसू शकतो, ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी विशाखा जोशी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जे झाले ते झाले, आता पुढचा निर्णय विचार करून घ्या, असे गडकरी त्यांना म्हणाले. मात्र आपण आपल्या संकल्पावर कायम असल्याचे स्पष्ट करीत उमेदवारी मागे घेणार नसल्याचे जोशी यांनी सांगितले. दुसरीकडे संघ परिवाराशी संबंधित व भाजपाच्या शहर कार्यकारिणीतील वरिष्ठ नेते श्रीपाद रिसालदार यांनीदेखील प्रभाग १९ मधून आपली उमेदवारी सादर केली आहे. त्यांनादेखील पक्षाच्या मोठ्या नेत्यांकडून संपर्क करण्यात आला. मात्र आता विषय संपला असून, मी निवडणूक लढणारच, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)