शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

स्लम भागातील ३० टक्के नागरिकांचे लसीकरण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:07 IST

डोस न घेतलेल्यांचा शोध : सामाजिक संस्थांची मदत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लसीचा मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने ...

डोस न घेतलेल्यांचा शोध : सामाजिक संस्थांची मदत

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लसीचा मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद आहे.

४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. नागपूर शहरात ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या सुमारे सहा ते साडेसहा लाख आहे. यातील ५ लाख ३ हजार ७४ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. अजूनही एक ते दीड लाख नागरिकांनी डोस घेतलेला नाही. यात प्रामुख्याने स्लम भागातील ३० टक्के नागरिकांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.

४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महापालिकेने लसीकरण आपल्या दारी मोहीम हाती घेतली आहे, सोबतच विविध उपक्रम राबविले जात आहेत. जनजागृती केली जात आहे. सेवाभावी संस्थांची मदत घेतली जात आहे. यात रोटरी ईशान्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मनपा कर्मचारी, भोपाळ इंजिनिअरिंगच्या माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप, समूह संघटक, महिला बचत गट व झोनस्तरावरील कर्मचारी आदींचा समावेश असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

राज्य शासनाने १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे जाहीर केल्यानंतर, शहरात केवळ ११ हजार १४१ नागरिकांना लस देण्यात आली. मात्र त्यानंतर लसीचा निर्माण झालेला तुटवडा बघता, या वयोगटाचे लसीकरण बंद करण्यात आले. आता केवळ ४५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जात आहे. त्यामुळे आधी दररोज १५ ते १६ हजार लाभार्थ्यांना डोस दिले जात होते. परंतु आता हा आकडा दोन ते अडीच हजारांवर आला आहे. नागपूर शहरात आतापर्यंत ५.३ लाख लाभार्थ्यांना पहिला डोस, तर १ लाख ६४ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

.............

लसीकरणासाठी पुढे यावे-आयुक्त

४५ वर्षांवरील लसीकरण मोहिमेमध्ये पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी पुढे येऊन आपले लसीकरण करून घ्यावे. मनपाद्वारे जारी दिशानिर्देशांचे पालन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहनसुद्धा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

...........

नागपुरात लसीकरणाची अद्ययावत स्थिती

पहिला डोस

आरोग्य सेवक - ४५,५४५

फ्रंटलाईन वर्कर -५२,९०५

१८ वयोगट - (सध्या बंद आहे)

४५ वयोगट - १,३४,०९३

४५ कोमार्बिड -८३,४२१

६० सर्व नागरिक - १,७६,४६९

पहिला डोस - एकूण - ५,०३,५७४

दुसरा डोस

आरोग्य सेवक - २३,१९४

फ्रंटलाईन वर्कर - १९,४७१

४५ वयोगट - २९,२८१

४५ कोमार्बिड - १८,२७९

६० सर्व नागरिक - ७३,७७९

दुसरा डोस - एकूण - १,६४,००४