खेडयापाडयातील शेकडो रुग्ण उपचारविना
बाबा टेकाडे
तालुका प्रतिनीधी
सावनेर दि.3: कित्तेक महिण्या पासून सावनेर तालुक्यातील 5 प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या क्षेत्रातील जनतेची आरोग्य सेवा प्रभारी अरोग्य अधिकाÚयांच्या भरवश्यावर आहे. विविध आरोग्य केद्राला नानाविध समस्यानी ग्रासल्यामुळे गा्रमीण भागातील शेकडो लोक उपचाराविना त्रस्त आहे. परिणामी जनतेला मनस्ताप सहन करावा लागतो एकुणच सावनेर क्षेत्रातील आरोग्य सेवेचे तिन तेरा वाजले.
गोरगरीब दलीत लोकांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे अवघड असते. बेताची आर्थीक परिस्थीती असल्याने त्यांच्यासाठी शासकीय रुग्णालय एकमेव आशेचे किरण असते या रुग्णालयात विविध व्याधीवर उपचार होतील असी आशा बाळगुन रुग्ण आणि त्याचे नातेवाईक धावपड करत प्राथमिक रुग्णालयात येतात. मात्र त्याची घोर निराषा होते.त्याचे समाधान होत नाही.तथा रुग्णाला इकडे तिकडे न्यावे लागते. यात खुपच मनस्ताप होतो. रुग्णालयात आले की भकाश चित्र दिसुन येते. विविध तपासण्याची व्यवस्था नसते तज्ञ डाॅक्टरांचा अभाव जानवते. सर्जरीची सुविधा राहत नाही .मग प्राथमिक आरोग्य केन्द्रातील वैद्यकीय अधिकारी उपलब्ध सुविधे नुसार थातूमातूर प्राथमिक उपचार करुन रुग्णाला सावनेरच्या ग्रामिण रुग्णालयात पाठविते याही रुग्णालयाच तसीच स्थिती असल्याने येथील डाॅक्टर रुग्णाला नागपूरला रेफर करतात. यात रुग्ण व त्याचा नातेवाईकाना विविध समस्याचा सामना करावा लागतो. यात अनेक रुग्णाचा जिव गमावतो तर काही रुग्णाना खाजगाी रुग्णालयाचा खर्च झेपत नसल्याने आणि नागपूरातील शासकीय रुग्णालयात राहुन उपचार घेणे शक्य नसल्याने घरीच गावठी उपचार करतात.
यामुळे दुर्गम भागातील खेडयापाडयातील शेकडो रुग्ण उपचारा विना व्याधीग्रस्त अवस्थेत जिवन जगत आहेत.
ग््रामिण क्षेत्रातील शेकडो विविध व्याधीने गासले आहेत.महागड औषधी खरेदी करु शकत नाही असी वास्तविक स्थिती आहे. त्यांच्या दुखःवर फुंकर घालणारा कुणी नाही असे विदार चित्र दिसते. या गोरगरीब जनतेच्या जिवनाशी निगडीत गंभीर समस्ये कडे लक्ष केन्द्रीत करण्यास लोकप्रतिनीधी सवड मिळेल काय असा जनतेचा खडा सवाल आहे.
सावनेर तालुक्यात खापा केळवद पाटणसावंगी बडेगाव खापरखेडा आणि चिचोली असे 5 प्राथमिक आरोग्य केन्द्र आहेत. सावनेर क्षेत्रातील कोणालाही शासकीय रुग्णालयात प्रसुती करीता स्वीेझरची व्यवस्था नाही प्रशिक्षण तज्ञ डाॅक्टर तथा सर्जरी साहीत्य उपलब्ध नाही. यामुळे त्यांना मेडीकल मेवो रुग्णालयात पाठविले जाते यात गर्भवती महिलेचा जीव टांगनीवर लागतो.अनेकदा गर्भवती महिला बाळ अथवा दोघेही मृत्युमुखी पडते. तथा त्याच्या कुटूबाची आभाळ कोसळल्यागत अवस्था होते याचे कुणालाही काहीच सोयीर शीतुक नाही.
प्रत्येक प्रथमिक आरोग्य केद्रात फक्त 5 बेडची व्यवस्था आहे.आॅम्बुलंस आली तरी काही तरी समस्या उदभवते ताुलक्यातील 5 ही प्राथमिक रुग्णालयात स्पेशालीस्ट नाही. प्राथमिक आरोग्य केद्रनीहाय रिक्त पदे कंसात गावे आणि लोकसंख्या असी-
बडेगाव -5 (38) 22819, केळवद-8 (29) 29855, पाटणसावगी-8 (27) 49035, खापा-5(19)31976, चिंचोली 3(12) 59603 एवढया मोठया संख्येच्या लोकाच्या आरोग्याची जवाबदारी असलेल्या विभागात तब्बल 29 कर्मचाÚयाची पदे रिक्त आहे यामुळे अन्य कर्मचारावर कामचा ताण वाढला याकडे संबंधीत वरिष्ठ आधिकाÚयानी लक्ष केद्रित करण्याची नितात गरज आहे.
पारशिवनी तालुक्यातील आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशात वाघ यांचे कडे सावनेरचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्यात आला. ते दोन्ही तालुक्याचा कार्यभार बघत आहेत. कनिष्ठ सहाय्यक मनोहर नागपूरे यांच्याकडे सावनेर केळवद आणि कळमेश्वर असा तीन ठीकाणचा कार्यभार आहे. सावनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्यक्रेद्रातील अनेक पदे रिक्त आहेत. मग खरोखरच क्षेत्रातील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळेल काय ? असा प्ऱ़श्र निर्माण होतो. विविध पक्षाच्या नेत्यांनी क्षे़त्रातील गोरगरीब जनतेच्या जिवनाशी निगडीत आरोग्य समस्याचे निवांरण करुन दीलासा दयावा.
या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी दिपक सेलोकर यांना विचारणा केली असता सावनेर तालुका आरोग्य अधिकाÚयाचा चार पाच महिन्यापासुन अतिरीक्त कार्यभार पारशिवणी तालुका आरोग्य अधिकाÚयाकडे असल्याचे मान्य केेले.तदवत प्राथमिक आरोग्य केद्रावर सोनोग्राफी सह अन्य तपासणिची सुविधा नाही स्वीझर किबहुना अन्य मोठया समस्या असलेल्या रुग्णाना नागपूरला पाठवावे लागते.
बाबा टेकाडे
( तालुका प्रतिनीधी )
सावनेर