शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आठ पंपातून भागते वन्यप्राण्यांची तहान

By admin | Updated: April 27, 2017 02:03 IST

उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असल्याने माणसांप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही पाण्याची अधिक गरज भासते.

सौरपंपाद्वारे पाणवठ्यांना पाणीपुरवठा : वन विभागाचा कळमेश्वर वनपरिक्षेत्रात उपक्रम कळमेश्वर : उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असल्याने माणसांप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही पाण्याची अधिक गरज भासते. वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, या उद्देशाने वन विभागाने कळमेश्वर वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या निमजी व लिंगा बिटमध्ये पाणवठ्यालगत बोअरवेल करून त्यावर सौर प्लेट बसवून पंपाद्वारे पाणवठ्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. वन विभागाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे वन्यप्राण्यांची तहान भागविली जात आहे. पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने वन्यप्राण्यांची संख्याही वाढत आहे. कळमेश्वर वनपरिक्षेत्रांतर्गत लिंगा, निमजी बिट १२३०.६३ हेक्टर परिसर जंगलाने व्यापलेला आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, नीलगाय, सांबर, चितळ, मोर आदी वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलातील पाणी आटल्याने वन्यप्राण्यांना पाण्याअभावी जंगलाबाहेर भटकंती करावी लागते. यामुळे या प्राण्यांना शिकाऱ्यांची भीती असून वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेतीच्या सभोवताल लावलेल्या जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्यास जीवितहानी होऊ शकते. तसेच शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही हे वन्यप्राणी करीत असतात. या समस्येवर उपाय म्हणून सदर दोन्ही बिटांमध्ये नाला खोलीकरण, चार तळे व आठ सौर ऊर्जेवर चालणारे पंप लावण्यात आले. सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यामुळे उन्हामुळे जंगलातील सौरपंप आपोआप सुरू होतात आणि सायंकाळी बंद होतात. यामुळे आठही पाणवठे पाण्याने पूर्णत: भरलेले असतात. शिवाय जंगलात खोदलेल्या चार तळ्यांपैकी दोन तळ्यांना उन्हाळ्यात पाणी आहे तर नाला खोलीकरणामुळे नाल्यामध्ये सद्यस्थितीत ३ ते ४ फुटापर्यंत पाणी उपलब्ध आहे. सदर तिन्ही योजना यशस्वी झाल्याने जंगलात सध्या भरपूर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे वन्यप्राण्यांची संख्या अलीकडे वाढलेली आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज मोहिते यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)