शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन नंबरचा चष्मा झाला ‘मायनस’

By admin | Updated: May 17, 2017 02:26 IST

लहानपणापासून साडेतीन नंबरचा चष्मा वापरणाऱ्या एका २५ वर्षीय युवकाला त्याच्या जाड भिंगाच्या चष्म्यातून मुक्ती मिळाली.

मेडिकल : ‘लॅसिक लेझर’वर पहिली शस्त्रक्रिया यशस्वी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लहानपणापासून साडेतीन नंबरचा चष्मा वापरणाऱ्या एका २५ वर्षीय युवकाला त्याच्या जाड भिंगाच्या चष्म्यातून मुक्ती मिळाली. कुठलाही चिरा नाही, रक्त नाही, वेदनारहित ही शस्त्रक्रिया अर्ध्या तासात आटोपून तो घरीही गेला. ही किमया घडली नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात उपलब्ध झालेल्या चार कोटी रुपयांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान ‘लॅसिक लेझर’ उपकरणामुळे. लहानांपासून ते वयोवृद्धांना दूरचे किंवा जवळचे नीट दिसत नसेल, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतरही अंधुक दिसत असेल, जाड चष्माच्या भिंगामुळे लग्न जुळत नसेल किंवा नोकरीत अडचण जात असेल अशा सर्वांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने उपचार करण्यासाठी ‘लॅसिक लेझर’ उपकरण महत्त्वाचे ठरते. राज्यात हे उपकरण केवळ मुंबईच्या शासकीय रुग्णालय जे.जे. येथेच आहे. परंतु खासगी इस्पितळात या शस्त्रक्रियेचा खर्च व मुंबईच्या शासकीय रुग्णालयात सामान्यांना जाणे-येणे करून उपचार घेण्याचा खर्च परडवणारे नसल्याने या उपकरणासाठी मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान यांनी पुढाकार घेतला. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी याचा पाठपुरावा केल्याने चार कोटींचे हे उपकरण मेडिकलमध्ये स्थापन झाले. १३ मे रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. मंगळवारी या उपकरणावर पहिली शस्त्रक्रिया नागपूरच्या एका २५ वर्षीय युवकावर यशस्वी पार पडली. या पहिल्या शस्त्रक्रियेला घेऊन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक मदान यांच्यासह सर्व चमूचे कौतुक केले. डॉ. मदान यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या युवकाला लहानपणापासून नंबरचा चष्मा लागला होता. तो वाढत जाऊन एका डोळ्याचा नंबर तीन तर दुसऱ्या डोळ्याचा नंबर साडेतीन पर्यंत पोहचला. त्या चष्मा लावूनच सर्व कामे करावी लागायची. यामुळे अनेक समस्येला त्याला सामोर जावे लागायचे. मंगळवारी या युवकावर ‘लॅसिक लेझर’ उपकरणाच्यामदतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. जाड चष्मा घालून आलेला हा युवक शस्त्रक्रियेनंतर विना चष्म्याने घरी गेला. केवळ अर्ध्या तासात ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. बुबुळाची जाडी कमी केली जाते ‘लॅसिक लेझर’ या उपकरणाला ‘लेझर इन सीतू केरॅटोमीलेयुसीस’ असे म्हटले जाते. डोळ्याच्या बुबुळाच्या मध्यभागातील जाडी साधारण ‘.५’ मिलिमीटर वाढलेली असल्यास त्यात एक नंबर कमी करण्यासाठी १०-१२ मायक्रॉनपर्यंत ही जाडी कमी केल्या जाते. ही सर्व प्रक्रिया ‘लेझर’द्वारे होते. या शस्त्रक्रियेत रुग्णाला इंजेक्शन दिले जात नाही किंवा चिराही लावला जात नाही. वेदनारहित ही १०० टक्के यशस्वी शस्त्रक्रिया आहे. - डॉ. अशोक मदान विभाग प्रमुख, नेत्ररोग विभाग मेडिकल