शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भू-माफिया बग्गा टोळीविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भूमाफिया बग्गा-सहारे टोळीतर्फे बोगस दस्तावेजाच्या माध्यमातून फसवणूक केल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भूमाफिया बग्गा-सहारे टोळीतर्फे बोगस दस्तावेजाच्या माध्यमातून फसवणूक केल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. प्रतापनगर पोलिसांनी गौरव सिंह बग्गा, त्याचा सासरा अशोक हरुमल खट्टर, प्रशांत शिवकुमार सहारे आणि गुरप्रित सिंह जसबीर सिंह रेणू यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बग्गाविरुद्ध एका महिन्यात हा तिसरा गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या संरक्षणकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

बग्गा त्याचा सासरा व इतर दोन्ही आरोपीविरुद्ध यापूर्वी ३ नोव्हेंबर रोजी वाठोडा पोलीस ठाण्यात फळ विक्रेते तवरलाल छाबरानी यांची फसवणूक तथा खंडणी वसुली केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अशोक खट्टर याला अटक करण्यात आली होती. तो न्यायिक कोठडी अंतर्गत तुरुंगात आहे. दरम्यान उपरोक्त ताजे प्रकरण समोर आले. या प्रकरणातील तक्रारकर्ता विशाल भजनकर आहे. विशालचे वडील कळमना बाजारात दलाल होते. बग्गा आणि सहारेने विशालला सांगितले की, त्याच्या वडिलांनी त्यांना १९९२ मध्ये प्लॉट विकला होता. त्याच्या चतुर्सीमेत फेरफार करायचे असल्याने उपनिबंधक कार्यालयात बोलावले.

बग्गा व सहारेने विशालला बोगस शपथपत्र व कब्जा पत्र दाखवून चतुर्सीमेत फेरफार करायचे असल्याचे सांगितले. तो २७ ऑक्टोबर रोजी विशालला कोतवालनगर येथील दुय्यम उपनिबंधक कार्यालयात घेऊन गेला. तिथे दस्तावेजावर त्याला स्वाक्षरी करण्यास सांगितले. विशालने जेव्हा दस्तावेज वाचण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला संशय आला. विशालने स्वाक्षरी करण्यास विरोध केला. तेव्हा आरोपी त्याला घेऊन कार्यालयाबाहेर आले. विशाल आणि त्याच्या आईला एक लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून शांत राहण्यास सांगितले आणि दिघोरी येथील प्लॉटची रजिस्ट्री केली. आज गुरुवारी विशालने प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक व गुन्हेगारी षड्‌यं‌त्र केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.