शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

घटस्फोटित मायबापहो मुलांचा विचार करा!

By admin | Updated: May 30, 2016 02:09 IST

भारतात विविध कारणांनी घटस्फोट होतात आणि घटस्फोट झालेले दाम्पत्य अहंकारामुळे एकमेकांचे तोंड पाहण्यासही तयार होत नाहीत.

भांडणाचा होतो वाईट परिणाम : हायकोर्टातील प्रकरणामुळे पुढे आली समस्याराकेश घानोडे नागपूरभारतात विविध कारणांनी घटस्फोट होतात आणि घटस्फोट झालेले दाम्पत्य अहंकारामुळे एकमेकांचे तोंड पाहण्यासही तयार होत नाहीत. अशावेळी खरा प्रश्न निर्माण होतो, तो त्यांच्या मुलांच्या भविष्याचा. दोघांनीही सकारात्मक भूमिका ठेवली नाही तर, मुले अंध:कारात ढकलली जातात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात असेच एक प्रकरण दाखल झाले होते. यातील घटस्फोटित दाम्पत्याच्या मुलीचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणावर नुकताच अंतिम निर्णय दिला असून, त्यात मुलीच्या शिक्षणाचा प्राधान्याने विचार करण्यात आला.प्रकरणातील घटस्फोटित दाम्पत्य सूरज (नागपूर) व कविता (भंडारा) यांना गार्गी नामक एकमेव कन्या असून, ती सध्या नाशिक येथील एका प्रसिद्ध निवासी शाळेत शिक्षण घेत आहे (तिन्ही नावे काल्पनिक). सूरजने गार्गीला नाशिक येथील निवासी शाळेत टाकण्याची परवानगी मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्यावेळी कविताने यास विरोध केला नव्हता. यामुळे ९ मे २०१४ रोजी कौटुंबिक न्यायालयाने सूरजचा अर्ज मंजूर केला. यानंतर सूरजने कविताकडून गार्गीचा ताबा घेतला व तिला ६ जून २०१४ रोजी शाळेत टाकले. दरम्यान, कविताने अचानक कौटुंबिक न्यायालयात अर्ज सादर करून गार्गीचा ताबा मिळण्याची विनंती केली. सूरज गार्गीला बळजबरीने घेऊन गेल्याचा दावा तिने केला. सूरजने यावर वेळेवर उत्तर न दिल्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने गार्गीचा ताबा कविताकडे देण्याचा आदेश दिला, तसेच निवासी शाळेला तसे कळविण्यास सांगितले. परिणामी गार्गीच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सूरजने या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने गार्गीचे शैक्षणिक भविष्य लक्षात घेऊन वादग्रस्त आदेश रद्द केला व प्रकरण कायद्यानुसार नव्याने निर्णय घेण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाकडे परत पाठविले. मात्र या प्रकरणामुळे घटस्फोटित दाम्पत्यांच्या मुलांचे भवितव्य कसे असुरक्षित असते हे समाजापुढे आले.न्यायमूर्तींनी घेतली मुलीची भेटउच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी या प्रकरणावर निर्णय दिला. त्यापूर्वी त्यांनी चेंबरमध्ये गार्गीची व्यक्तिश: भेट घेतली. गार्गीसोबत काही वेळ संवाद साधल्यानंतर ती बुद्धीने अत्यंत हुशार व चपळ असल्याचे न्यायमूर्तींना दिसून आले. परिणामी, न्यायालयाने चांगले शिक्षण मिळाल्यास गार्गीचे भविष्य उज्ज्वल असल्याचे निर्णयात नमूद केले. तसेच आई-वडिलांच्या भांडणामुळे तिच्या शैक्षणिक जीवनावर वाईट परिणाम पडत असल्याचे निरीक्षण नोंदविले.कौटुंबिक न्यायालयावर नाराजीकौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणात अत्यंत घाईने निर्णय दिल्यामुळे उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. कविताच्या अर्जात केवळ गार्गीचा ताबा देण्याची विनंती करण्यात आली होती. यामुळे गार्गी सूरजच्या ताब्यात आहे का, हे प्रथम निश्चित करायला हवे होते आणि उत्तर नकारार्थी मिळाल्यास गार्गीला निवासी शाळेतून काढल्यास तिच्या शैक्षणिक भविष्य व वैयक्तिक जीवनावर वाईट परिणाम होईल काय, याचा विचार करायला हवा होता. परंतु यावर विचारच करण्यात आला नाही, असा निष्कर्ष उच्च न्यायालयाने नोंदविला.