शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

चोरांनी केला ‘कुलर डक्ट’चा वापर

By admin | Updated: January 19, 2017 02:57 IST

बिल्डरच्या कार्यालयातील आॅफिस बॉयने साथीदारांच्या मदतीने कार्यालयातील साडेतीन लाख रुपये चोरून नेले.

आॅफिस बॉयसह तिघांना अटक : ३.५० लाख रुपये चोरीप्रकरण नागपूर : बिल्डरच्या कार्यालयातील आॅफिस बॉयने साथीदारांच्या मदतीने कार्यालयातील साडेतीन लाख रुपये चोरून नेले. गणेशपेठ पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत तिघांना अटक केली. आरोपींनी कार्यालयात शिरण्यासाठी ‘कुलर डक्ट’चा (हवा येण्याची जागा) वापर केला होता हे विशेष. शाहनवाज ऊर्फ सोनू अब्दुल जमील (२३) रा.अरविंदनगर, आकाश पुरुषोत्तम मौंदेकर (२६) रा. संजीवनी क्वॉर्टर आणि शाहरुख खान ऊर्फ राजा अब्दुल रशीद (२०) रा. गरीबनवाजनगर अशी आरोपीची नावे आहे. भालदारपुरा येथे हसन अली यांचे राज अ‍ॅण्ड राज कन्स्ट्रक्शन आहे. त्यांच्या कार्यालयात सोनू आॅफिस बॉय आणि वाहन चालक म्हणून काम करीत होता. १५ जानेवारी रोजी रात्री कार्यालयातील साडेतीन लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा यात ओळखीच्या व्यक्ती सहभागी असल्याचा संशय आला. पोलिसांना सोनूवर संशय आला. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. तो संशयास्पद युवकांसोबत राहत असल्याचे आढळून आले. या आधारावर त्याची विचारपूस करण्यात आली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी कठोरपणे विचारपूस केली तेव्हा त्याने आकाश व राजाच्या मदतीने चोरी केल्याचे कबूल केले. सोनूला कार्यालयात मजुरांना वाटप करण्यासाठी असलेली रक्कम ठेवली असल्याची माहिती होती. १५ जानेवारी रोजी रात्री तिघेही मोमीनपुरा येथे पोहोचले. सोनू मोमीनपुऱ्यातच थांबला तर आकाश आणि राजा कार्यालयात गेले. ते छतावर ठेवलेल्या कुलर डक्टमधून कार्यालयातील अकाऊंट सेक्शनमध्ये पोहोचले. सोनूने सांगितल्यानुसार ड्रावरमधून साडेतीन लाख रुपये चोरले. पोलिसांनी आकाश व राजलाही अटक केली. (प्रतिनिधी)