शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

चोर म्हणाला... साहेब सीसीटीव्हीच बंद आहेत! रेल्वेस्थानकावरील २३ पैकी १५ कॅमेरे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 11:47 IST

Nagpur News इतवारी रेल्वेस्थानकावरील २३ पैकी १५ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले असून सराईत चोरट्यांनाही ही बाब माहीत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चोरीच्या एका गुन्ह्यात लोहमार्ग पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्याने केलेली चोरी सीसीटीव्हीत कैद झाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी त्या चोराला सांगितले. परंतु साहेब सीसीटीव्हीच बंद आहे मग घटना सीसीटीव्हीत कशी कैद होईल, असे चोरटा म्हणाला अन् पोलीसही बुचकाळ्यात पडले. इतवारी रेल्वेस्थानकावरील २३ पैकी १५ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले असून सराईत चोरट्यांनाही ही बाब माहीत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी इतवारी रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून विकास कामे सुरू आहेत. फूट ओव्हर ब्रिजच्या कामासाठी तोडफोड करण्यात आली. यामुळे केबल क्षतिग्रस्त होऊन १५ कॅमेरे बंद पडले आहेत. अलिकडेच गोंदियाचे पोलीस एका चोरी प्रकरणाच्या तपासासंदर्भात इतवारी रेल्वे स्थानकावर आले. मात्र, सीसीटीव्हीच बंद असल्याने त्यांना आल्या पावलीच परतावे लागले. रेल्वे प्रशासनानुसार हा विषय सुरक्षा दलाशी संबधित आहे. तर आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सध्या सीसीटीव्ही यंत्रणा स्टेशन मास्तरांच्या अंतर्गत असल्याचा दावा केला. अलिकडे इतवारी स्थानकावरील आरपीएफ ठाण्यासमोरच असलेल्या कॅन्टीनमध्ये चोरी झाली होती. काही दिवसातच पुन्हा स्टेशन परिसरात चाकूच्या धाकावर प्रवाशाला लुटण्यात आले. लोहमार्ग पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींना अटक केली. परंतु सीसीटीव्ही बंद असल्यामुळे आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना अडथळे येत आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही त्वरित सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

............

टॅग्स :cctvसीसीटीव्ही