शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

हा चोर तुमच्या सोसायटीत तर आला नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:45 IST

पॉश सोसायट्यात दुपारी रेकी करायची आणि रात्री हात साफ करायचा, अशी टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. उच्चभ्रू नागरिकासारखे वर्तन करीत या टोळीचा एक सदस्य दुपारी पॉश सोसायट्यात प्रवेश करतो,

ठळक मुद्देसीसीटीव्ही तपासा : उच्चभ्रूसारखे वर्तन, दुपारी करतो रेकी, गोकुल धास्तावले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पॉश सोसायट्यात दुपारी रेकी करायची आणि रात्री हात साफ करायचा, अशी टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. उच्चभ्रू नागरिकासारखे वर्तन करीत या टोळीचा एक सदस्य दुपारी पॉश सोसायट्यात प्रवेश करतो, तिथील रेकी झाल्यानंतर टोळीला पुढच्या कामासाठी हिरवी झेंडी दाखवितो, असा धक्कादायक प्रकार गोकुल हाऊसिंग सोसायटी (बोरगाव) परिसरात उजेडात आला आहे. या परिसरातील काही सतर्क नागरिकांनी या चोरट्याचे फोटो सीसीटीव्हीत कैद केले आहेत.गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोरगाव परिसरात गोकुल हाऊसिंग सोसायटी आहे. या सोसायटीत अंदाजे २५ हून फ्लॅट स्कीम आहेत. तर काही नव्या इमारतींचे बांधकामही सुरू आहे. त्यामुळे या परिसरात वर्दळ वाढली आहे. या संधीचा फायदा घेत चोरट्याची एक टोळीही या परिसरात सक्रिय झाली आहे. या सोसायटीतील लियो गॅलक्सीमध्ये दिवाळीत चोरट्यांनी हात साफ केला. गत वर्षभरापासून गोकुलमधील अनेक फ्लॅट स्कीममध्ये चोरीच्या घटना घटत आहेत. शनिवारी ‘अल्पाईन मिडोज’ या बिल्डींगमध्ये या टोळीतील सदस्याने दुुपारी ४.३० वाजता रेकी केली आणि एका फ्लॅट समोरील महागड्या वस्तू पळविल्या. मात्र चोरट्यावर पाळत ठेवून असलेल्या काही नागरिकांनी त्याचे हे कृत्य सीसीटीव्हीत कैद केले आहे.या गोकुल हाऊसिंग सोसायटीतील फ्लॅट स्कीमधील फ्लॅट मूळ मालकांनी भाड्याने दिले आहेत. यातील किती फ्लॅट मालकांनी भाडेकरुंची माहिती पोलिसांना दिली आहे, हाही एक संशोधनाचा विषय आहे. भाडेकरूंच्या वाढत्या संख्येने या परिसरात बाहेरच्या नागरिकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका मात्र स्थानिक नागरिकांना बसतो आहे. यातच गोकुल हाऊसिंग सोसायटीचा काही परिसर गोरेवाडा रोडवर येतो.या रोडवरील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रेकी करणाºया चोरट्यांचे रात्री या परिसरात फावते. त्यामुळे या भागात दुपारी आणि रात्री पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.