शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अन् चोरट्याला फुटला पाझर; पीडिताने हंबरडा फोडल्याने परत केले पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 21:57 IST

चोरट्यांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून बँकेतील सर्व रक्कम पळवली. पण चोरट्यांचा नंबर मिळाल्यावर पीडित व्यक्तीने त्यांना असे काही सुनावले, आपल्या बिकट परिस्थितीबद्दल असा हंबरडा फोडला की चोरट्यांनाच पाझर फुटला आणि चोरट्यांनी चोरलेल्या रकमेचा अर्धा भाग पीडित व्यक्तीच्या खात्यात पुन्हा टाकला.

ठळक मुद्देऑनलाईन झाली होती फसवणुक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे कामधंदे बंद झाल्याने लोकं त्रस्त आहेत. मोलमजुरी करून कमावणारा कष्टकरी वर्ग तर सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करतोय. अशात चोरट्यांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून बँकेतील सर्व रक्कम पळवली. पण चोरट्यांचा नंबर मिळाल्यावर पीडित व्यक्तीने त्यांना असे काही सुनावले, आपल्या बिकट परिस्थितीबद्दल असा हंबरडा फोडला की चोरट्यांनाच पाझर फुटला आणि चोरट्यांनी चोरलेल्या रकमेचा अर्धा भाग पीडित व्यक्तीच्या खात्यात पुन्हा टाकला.पीडित व्यक्तीचे नाव प्रमोद सिंग असून, तो वाडी परिसरात राहतो. त्याच्याकडे मालवाहतूक करणारा मिनी ट्रक आहे. लॉकडाऊनमुळे सर्व कामधंदे बंद पडले आहे. प्रमोद सिंग मिनी ट्रकचा फास्टटॅग रिन्यू करीत असताना चोरट्यांनी त्याच्या बँक खात्यामधुन १५ हजार रुपये दुसऱ्या खात्यामध्ये वळविले. त्यापुर्वी चोरट्यांनी प्रमोद सिंह यांना एका बँकेची फास्टटॅग रिन्यू करण्याची खोटी लिंक ऑनलाईन पाठवून सर्व बँकींग डिटेल मिळविले. नंतर एका दुसऱ्या लिंकने प्रमोद यांच्या मोबाईलला काही वेळेसाठी हँग करून बँक खात्यातून सर्वच्या सर्व १५ हजार रुपये लंपास केले.लॉकडाऊनच्या काळात कामधंदे बंद, वाहन घरासमोर उभे, बँकेचे हप्ते कसे भरावे, कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न प्रमोद सिंग याच्यापुढे ठाकला. त्याने लगेच पोलीस स्टेशनला धाव घेतली. पण पोलीसांनी त्याला सायबर सेलकडे जाण्यास सांगितले. अखेर प्रमोद यांनी स्वत:च चोरांना जाब विचारण्याचे ठरविले. त्याला ज्या नंबरवरून लिंक आली होती. त्यावर कॉल करणे सुरू केले. अनेक कॉल केल्यानंतर समोरुन कोणतेही उत्तर आले नाही. मात्र प्रमोदने चोरट्यांचा पिच्छा सोडला नाही. तो सतत कॉल करीत राहिला. अखेरीस चोराने कॉल उचलला आणि प्रमोद सिंग यांनी आपली व्यथा सांगत चोरट्यांना चांगलेच सुनावले. चोरट्यांना सुनावत असतानाच त्याने हंबरडाच फोडला. प्रमोद सिंह यांची व्यथा आणि त्याचे रडणे ऐकून अखेर चोरांनाही पाझर फुटला. त्यांनी प्रमोदला धीर देत पैसे परत करण्याची तयारी दर्शविली. आणि खरोखर फोन ठेवताच प्रमोद सिंह यांच्या बँक खात्यामध्ये चोरट्यांनी ८ हजार रुपये पाठविले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम