नागपूर : याकूब मेमनच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आणि बुधवारीच निकाल येणार. त्याचप्रमाणे बुधवारीच राज्यपालांकडे असलेल्या दयेच्या याचिकेवरही निकाल येईल, अशी कारागृह प्रशासनाला अपेक्षा होती. त्यामुळे या दोन्ही निर्णयाच्या ‘हार्ड कॉपी‘तातडीने मिळवण्यासाठी अनुक्रमे दिल्ली आणि मुंबईला दोन विशेष अधिकारी रवाना करण्यात आले होते. फाशीच्या अंमलबजावणीत कोणताही तांत्रिक मुद्दा अडचणीचा ठरू नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरा हे दोन्ही अधिकारी नागपुरात पोहचल्याचे वृत्त आहे.
‘ते’ अधिकारी परतले
By admin | Updated: July 30, 2015 02:48 IST