शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही; जलज शर्मा यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 10:23 IST

नागपूर महापालिकेच्या माध्यमातून सर्व रुग्णांना ऑक्सिजनची पूर्तता व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात ऑक्सिजनची सर्वात जास्त मागणी आहे. नागपुरात सध्या खासगी रुग्णालयात १३७७ बेडस आणि शासकीय रुग्णालयात १४५० बेडस उपलब्ध आहेत. कोविड आणि नॉन कोविड रुग्णांसाठी ४२०० जम्बो सिलेंडरची मागणी होत आहे तर शहरात ४५०० जम्बो सिलेंडरचे उत्पादन होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून सर्व रुग्णांना ऑक्सिजनची पूर्तता व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली.नागपुरात सध्या ३ शासकीय, २ धर्मादाय आणि ३३ खासगी रुग्णालय कोविड रुग्णांना सेवा देत आहेत. यात लवकरच नवीन कोविड रुग्णालयांची भर पडणार आहे. भविष्याची गरज लक्षात घेता ऑक्सिजनची पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.नागपुरात कोविड टेस्टिंगच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. अगोदर दररोज २००० ते २५०० टेस्टिंग होत होती. आता मनपा व खासगी रुग्णालयांच्या माध्यमाने ६ हजार लोकांची टेस्टिंग होत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.अंतिम टप्प्यातील उपचारामुळे मृत्यूआयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात दररोज आरोग्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची टीम डेथ अनॅलिसिस करीत आहे. तीन ते चार तास होणाऱ्या या आढावा बैठकीत शहरातील मृत्यूची कारणे शोधली जात आहेत. मृतांची संख्या वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे कोरोना रुग्ण अंतिम टप्प्यात रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याचे निदर्शनास आले आहे.वेळीच चाचणी कराकोरोनाची लक्षणे दिसल्यास लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा कोविड चाचणी करून वेळेवर उपचार घेतल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. नागरिकांनी मनपाच्या नजीकच्या केंद्रात चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जलज शर्मा यांनी केले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका