शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पर्यायांअभावी उणिवा आल्या चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:24 IST

विराट कोहली (७/१०) वन डे मालिकेत शतक न झळकावताही फलंदाजीत सातत्य राखले.गोलंदाजांचा योग्य वापर न केल्याने मात्र टीकेचा सामना ...

विराट कोहली (७/१०)

वन डे मालिकेत शतक न झळकावताही फलंदाजीत सातत्य राखले.गोलंदाजांचा योग्य वापर न केल्याने मात्र टीकेचा सामना करावा लागला. तिसऱ्या वन डेत प्रेरित करीत संघाला विजयी मार्गावर आणले.

अजिंक्य रहाणे(४.५/१०)

पहिल्या सामन्यात आकर्षक ७६ धावा केल्यानंतर पुढच्या दोन्ही सामन्यात शानदार सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरला. क्षेत्ररक्षणातील उणिवा देखील प्रकर्षाने दिसल्या.

मयंक अग्रवाल (४ /१०)

पहिल्या दोन्ही सामन्यात चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. डाव सावरण्याऐवजी फटकेबाजीवर भर दिला. स्वत:ला आयपीएलमधून बाहेर काढू शकला नाही.

श्रेयस अय्यर (२/१०)

सीमारेषेवर चांगले क्षेत्ररक्षण केले मात्र फलंदाजीत निराशा झाली. डाव सावररण्यात अपयशी. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर कमालीचे अपयश.

लोकेश राहुल (४.५/१०)

राहुलला काही प्रगाणात यशस्वी मानले जाईल. दुसऱ्या वन डेतील ७६ धावांचा अपवाद वगळता मालिकेत मोठी खेळी करू शकला नाही. यष्टिमागे मात्र यशस्वी कामगिरी.

हार्दिक पांड्या (९/१०)

९० आणि नाबाद ९२ धावा ठोकून फलंदाजीत यशस्वी पुनरागमन केले. संघाची गरज ओळखून फटकेबाजी करण्यात यशस्वी. जखमेतून पूर्णपणे सावरु न शकल्याने अधिक गोलंदाजी करू शकला नाही पण योग्यतेची झलक पहायला मिळाली.

रवींद्र जडेजा (७/१०)

अपेक्षेनुरुप अधिक गडी बाद करता न आल्याने निराश झाला मात्र फलंदाजीत देखणी कामगिरी केली. तिसऱ्या वनडेत विशेषत: अर्धशतकी खेळी करीत लक्ष वेधले. अविश्वसनीय असे दोन झेल सोडले.

मोहम्मद शमी (४/१०)

पहिल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यात मात्र महागडा ठरला. स्वींग आणि सीम चेंडू टाकण्यात अपयशी. सुरुवातीला गडी बाद करण्यातही अपयश.

युजवेंद्र चहल (१/१०)

मालिका जिंकून देणारा गोलंदाज असलेला गोलंदाज सध्या अपयशी ठरला. गडी बाद करण्यातही अपयशी आणि चेंडूवर नियंत्रण राखण्यातही कमालीचा अयशस्वी. भरपूर धावा मोजल्याने तिसऱ्या सामन्यातून बाहेर बसला.

नवदीप सैनी (१/१०)

अनुभवहीन असल्याचे जाणवले. चांगला मारा करण्याचा प्रयत्न केला पण वेग आणि टप्पा यांच्यात अचूकता राखण्यात अपयशी. डेथ ओव्हर्समध्ये फारच खर्चिक ठरला.

जसप्रीत बुमराह (४/१०)

पहिल्या दोन सामन्यात अडखळत खेळला. बळी न घेता मोठ्या धावा मोजल्या. अखेरच्या सामन्यात यॉर्करच्या बळावर मॅक्सवेल सारख्याला बाद केले.

शुभमान गिल (४.५/१०)

तिसऱ्या सामन्यात मयांक अग्रवालऐवजी स्थान मिळाले. अप्रतिम फलंदाजीचे दर्शन. याच बळावर टी-२० त खेळण्याची दावेदारी सादर केली.

शार्दुल ठाकूर (६.५ /१०)

तिसऱ्या सामन्यात तीन महत्त्वाचे बळी घेत विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान. कठोर मेहनतीसह स्वींग आणि सीमचा योग्य वापर केला.

कुलदीप यादव (३.५ /१०)

तिसऱ्या वन डेत चहलसोबत संधी मिळाली. अपेक्षेनुसार उत्कृष्ट गोलंदाजी केली. लौकिकानुसार कौशल्यपूर्ण मारा करण्यात मात्र अपयशी ठरला.

टी. नटराजन ( ५ /१०)

तिसऱ्या वन डेत शानदार कामगिरीसह यशस्वी पदार्पण केले. काही करुन दाखवण्याचा निर्धार जाणवला. दडपणातही मधल्या षटकात धावा रोखणारी कामगिरी करीत लक्ष वेधले.भविष्यात दमदार कामगिरीची अपेक्षा.