शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

नक्षलग्रस्त भागासाठी स्वतंत्र मंत्रालय हवे

By admin | Updated: May 15, 2014 02:38 IST

नक्षलवादाचा बीमोड करायचा असेल तर सरकारने नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय उभारले पाहिजे. ज्यामध्ये नक्षलग्रस्त भागासाठी स्वतंत्र बजेट असेल ..

नागपूर : नक्षलवादाचा बीमोड करायचा असेल तर सरकारने नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय उभारले पाहिजे. ज्यामध्ये नक्षलग्रस्त भागासाठी स्वतंत्र बजेट असेल व या निधीतून तेथील नागरिकांसाठी रस्ते, रुग्णालये, वीज, पाणी, रोजगार व इतर साधनसुविधा उपलब्ध करून देता येतील, अशी मागणी मनसेचे विधानसभेतील गटनेते आ. बाळा नांदगावकर यांनी केली.नांदगावकर यांनी बुधवारी गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन पोलीस जवानांची नागपुरातील ऑरेंजसिटी हॉस्पिटल येथे भेट घेतली. जखमी जवान हेमंत बनसोड यांच्या पत्नी व भाऊ आणि पंकज सिडाम यांच्या आई-वडिलांना भेटून धीर दिला. यावेळी मनसेतर्फे जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५0 हजार रुपयांची मदत देण्यात आली.यावेळी नांदगावकर म्हणाले, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे राजीनामा मागून काहीही उपयोग होणार नाही. निदान त्यांनी शहिदांच्या कुटुंबीयांची माफी तरी मागावी. नक्षलग्रस्त भागात काम करणार्‍या पोलीस जवानांकडे बंदुकीशिवाय कुठलीही अत्याधुनिक शस्त्रे नाहीत, बुलेटप्रूफ ज्ॉकेट नाहीत, बुलेटप्रूफ वाहने नाहीत. अशात ते नक्षलवाद्यांशी सामना कसा करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नक्षली भागात काम करणार्‍या जवानांना फक्त २५00 रुपये कमांडो भत्ता मिळतो. नक्षल भागात कर्तव्य बजावणारे पोलीस जवान हे २२ ते ३0 वयोगटातील असतात. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या जीवाची चिंता असते. मात्र, तरीही जवान निष्ठेने कर्तव्य बजावतात. या पोलिसांना ५0 हजार रुपयांहून अधिक पगार देण्याची मागणी त्यांनी केली. शहीद होणार्‍या जवानाच्या कुटुंबाला शहीद कुटुंबीयांचा दर्जा देऊन २५ लाखापर्यंत मदत करावी, कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी, पेन्शन योजना तसेच कुटुंबीयांना एक घर सरकारने द्यावे. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष हेमंत गडकरी, गडचिरोली संपर्क अध्यक्ष संतोष नलावडे, जिल्हा अध्यक्ष किशोर सरायकर, मनीष देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)